Omicron Variant: राज्यात मंगळवारी ११ नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

Omicron Variant: राज्यात मंगळवारी ११ नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आज मंगळवारी राज्यात ११ नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आज आढळलेल्या ११ ओमिक्रॉन रुग्णांपैकी ८ रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीतील समोर आले आहेत तर १ रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे आढळला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढलेल्या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ६५ इतकी झाली आहे. यापैकी ३४ रुग्णांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज राज्यात आढलेल्या ११ ओमायक्रॉन रुग्णांपैकी ८ रुग्ण हे मुंबईतील असून मुंबई विमानतळावरील केलेल्या तपासणीदरम्यान आढळले आहेत. यातील प्रत्येकी १ रुग्ण केरळ , गुजरात आणि ठाणे येथील आहे तर इतर रुग्ण मुंबईतील आहेत. या रुग्णांमध्ये १८ वर्षाखालील दोन मुले आहेत.
यातील २ रुग्ण युगांडा येथून दुबई मार्गे मुंबईत आले आहेत. ४ रुग्ण हे इंग्लंड तर २ रुग्ण दुबई येथून मुंबईत आले आहेत. यातील २ मुले १८ वर्षाखालील असल्याने त्यांचे लसीकरण झालेले नाही. सर्व रुग्ण लक्षणेविरहित ते सौम्य या गटातील आहेत.

उस्मानाबाद येथे आधी आढळलेल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची १३ वर्षांची मुलगी आज ओमायक्रॉन बाधित आढळली आहे. तिला कोणतीही लक्षणे नाहीत. त्याचप्रमाणे केनियावरुन हैद्राबाद मार्गे नवी मुंबई येथे आलेला एक १९ वर्षीय तरुण देखील ओमायक्रॉन बाधित आहे. त्याचे लसीकरण पूर्ण झाले असून त्याला कोणताही लक्षणे नाहीत. मात्र तरीही त्याला क्वारंटाइन करण्यात आले आहे.


हेही वाचा – राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला अवघे काही तास शिल्लक, मुख्यमंत्री अनुपस्थित राहणार?

First Published on: December 21, 2021 9:25 PM
Exit mobile version