Coronavirus: स्वॅब व एक्स-रे चाचणी करणाऱ्या अत्याधुनिक व फिरत्या बसचे लोकार्पण

Coronavirus: स्वॅब व एक्स-रे चाचणी करणाऱ्या अत्याधुनिक व फिरत्या बसचे लोकार्पण

Coronavirus: स्वॅब व एक्स-रे चाचणी करणाऱ्या अत्याधुनिक व फिरत्या बसचे लोकार्पण

कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी स्वतंत्र रूमसह मोबाइल एक्स रेची स्वतंत्र व्यवस्था असलेल्या अत्याधुनिक बस आता महापालिकेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातील एक बस महापालिकेला प्राप्त झाली असून या फिरत्या बसच्या माध्यमातून रुग्णांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. माणसांची स्वॅब व एक्स-रे चाचणी करणाऱ्या अत्याधुनिक व वातानुकूलित फिरत्या बसचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या हस्ते झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी ०१ मे २०२० रोजी वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे पार पडले.

मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून जी/दक्षिण विभागामार्फत पुण्यातील क्रसना डायग्नोस्टिक्स प्रा. लि. आणि आय.आय.टी. एलुयुमनाय काउंसिल इंडिया या संस्थेच्या वतीने सीएसआर फंडातून कोरोना चाचणीची अत्याधुनिक तांत्रिक बस ही तयार करून देण्यात आली आहे.


हेही वाचा – Big Breaking: लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवला


जी/दक्षिण विभागामार्फत वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे कोरोनाच्या cc सी२ ची व्यवस्था करण्यात आली आहे. या अत्याधुनिक बसमध्ये कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी स्वतंत्र रूमसह मोबाइल एक्स रेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ही चाचणी प्रशिक्षित तंत्रज्ञाकडून करण्यात येऊन क्लाऊड ट्रान्सफर्मद्वारे रेडिओलॉजी विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर विविध माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या माध्यमातून कमी वेळेत व प्रभावीपणे रुग्ण शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

यासोबतच मुंबई महानगरपालिका याप्रकारच्या बसेस तयार करून आरोग्य विभागाच्या संबंधित रूग्णालयांमध्ये कोरोना चाचण्यांसाठी यापुढे वापरण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे, डॉ. मुफझल लकडावाला, क्रसना डायग्नोस्टिक्स प्रा. लि. च्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. किरणकुमार भिसे, पॅथॉलॉजीचे उपाध्यक्ष डॉ.राजू राव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

First Published on: May 1, 2020 7:57 PM
Exit mobile version