मुंडे प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोप करणाऱ्या महिलेविरोधात कृष्णा हेगडेंची पोलिसांत तक्रार

मुंडे प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोप करणाऱ्या महिलेविरोधात कृष्णा हेगडेंची पोलिसांत तक्रार

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. धनंजय मुंडे यांच्यावरती ज्या महिलेने आरोप केले आहेत, त्या महिलेविरोधात भाजप नेते कृष्णा हेगडे अंधेरीच्या अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत. ही महिला २०१० ते २०१५ या काळात छळ करत होती, ब्लॅकमेल करत होती, असा आरोप हेगडे यांनी केले आहेत. त्यांच्यासारखे अनेकजण आहेत ज्यांना या महिलेने फसवायचा प्रयत्न केला आहे. ज्यावेळी धनंजय मुंडे यांचं प्रकरण समोर आलं. त्यावेळा आणखी असे प्रकार घडायला नको, या महिलेने इतर कोणाला फसवायला नको, यासाठी मी समोर येऊन तक्रार दाखल करतोय असं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे.

“२०१० पासून रेणू शर्मा नावाची महिला मला स्टॉक करते, छळ करत होती. माझ्यावर दबाव टाकत होती की तिच्यासोबत संबंध ठेवावे. मी तीला टाळत होतो. तिचा नंबर मी ब्लॉक केला होता. ती वेगवेगळ्या नंबरवरुन मला मॅसेज, WhatsApp वर मॅसेज करत होती. मी माझ्या परिसरातील मित्रांना भेटून तिच्या पार्श्वभूमीची माहिती काढली. त्यात मला असं कळालं की ही महिला संशयास्पद आहे. हे हनी ट्रॅप प्रकरण वाटलं. त्यामुळे सतर्क राहिलो. त्यानंतर तिला टाळत राहिलो. चार-पाच वर्ष मागावर होती. मला वाटतं तिला म्युझीक अल्बम काढायचा आहे. त्यासाठी तिला पैसे पाहिजे होते. त्यामुळे मी तिला टाळत राहिलो. अनेकवेळा तिने मला तुम्ही माझ्याशी संबंध का नाही ठेवत असं विचारलं होतं. बऱ्याच काळानंतर ६ जानेवारी २०२१ ला तिने परत मॅसेज केला. परत ७ जानेवारीला मॅसेज केला. आप मुझे भूल गये क्या? असा तिने मॅसेज केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे प्रकरण समोर आलं. त्यामुळे मला वाटतं जी लोकं इतरांना फसवतात, ब्लॅकमेल करतात, त्यांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी मी इतक्या वर्षांनी समोर येऊन हे प्रकरण आणलं,” असं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं.


हेही वाचा – राष्ट्रवादीला इभ्रत राखायची असेल तर मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही – प्रकाश आंबेडकर 


 

First Published on: January 14, 2021 4:36 PM
Exit mobile version