राजकारण हे तुमचं काम नाही, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

राजकारण हे तुमचं काम नाही, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला गळती लागली आहे. परंतु ही गळती अद्यापही थांबण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्हे, तालुका आणि महानगरपालिकामंधील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी वेगाने शिंदे गटात दाखल होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अॅक्शन मोडमध्ये आहेत. परंतु आता कोकणात नव्याने नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांनीही अवघ्या काही तासांत राजीनामे दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत ट्विटमधून एक सल्ला दिला आहे.

उद्धव ठाकरे आता तरी ओळखा तुम्ही सगळ्यांनाच नकोसे झाला आहात. फोटोग्राफी हा तुमचा छंद आहे तोच तुम्ही जोपासावा, राजकारण हे तुमचं काम नाही. वडिलांच्या जीवावर आयुष्य जगलात पण त्यांनी केलेलं कार्य टिकवता आलं नाही म्हणून तुमची ही अवस्था, अशी टीका निलेश राणेंनी ठाकरेंवर केली आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांचे समर्थक असणारे उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेट्ये आणि युवा तालुका अधिकारी तुषार दळवी यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर ठाकरेंनी दिलेल्या आदेशाने रत्नागिरीत नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच शिवसेनेचे शहर संघटक आणि महिला संघटक या पदांचीही नव्याने नियुक्ती केली होती.

युवा संघटक वैभव पाटील यांची नेमणूक झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांनी पदाची राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.


हेही वाचा : राष्ट्रपतीपद निवडणूक : नितीन राऊतांच्या मतदानावर लोणीकरांचा आक्षेप


 

First Published on: July 18, 2022 1:52 PM
Exit mobile version