तेंडुलकर पिता-पुत्रांचे उदाहरण देत निलेश राणेंची ठाकरेंवर टीका, म्हणाले…

तेंडुलकर पिता-पुत्रांचे उदाहरण देत निलेश राणेंची ठाकरेंवर टीका, म्हणाले…

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांना सचिन तेंडुलकर हे किती आवडतात, हे नेहमीच त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून दिसून येत असते. निलेश राणे यांनी आता मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्याशी संबंधित ट्वीट केले आहे. पण या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे कुटूंबावर निशाणा साधला आहे. सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमधून संन्यास घेताना मला सांभाळले तसे आता अर्जुनला देखील सांभाळा असे सांगितले नव्हते, असे ट्वीट करत निलेश राणे यांनी ठाकरे कुटूंबाला डिवचले आहे.

निलेश राणेंनी काय लिहिले आहे ट्वीटमध्ये?
“काल अर्जुन तेंडुलकरने स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनत करून पहिली विकेट घेतली. सचिन तेंडुलकरने क्रिकेट मधून संन्यास होताना मला सांभाळला आता अर्जुनला पण सांभाळा असं म्हटलं नव्हतं, कर्तुत्वाला ओळख सांगावी लागत नाही, कामातून दिसत असते. जय महाराष्ट्र.” निलेश राणे यांनी त्यांच्या या ट्वीटमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी त्यांच्या शेवटच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये लोकांना म्हंटले होते की, “उद्धवला आणि अदित्यला तुम्ही स्वीकारले आहे. आतापर्यंत तुम्ही मला सांभाळले यापुढे उद्धवला सांभाळा, अदित्यला सांभाळा,” त्यांच्या या भावनिक आवाहनानंतर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला कायमचं साथ दिल्याचे पाहायला मिळाले. पण त्यांच्या या विधानाची आठवण करून देत निलेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच टीका केली आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्ठित करण्यात येत आहे.

याआधी देखील निलेश राणे यांनी सचिन तेंडुलकर यांच्यासंबंधीत एक ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले होते की, “31 तारखेपासून IPL सुरू झालय पण कमर्शियल ब्रेक मध्ये जुगाराचे ॲड सर्वाधिक आहेत आणि ते प्रमोट करणारे ॲडमध्ये क्रिकेटरच आहेत. मी आजपर्यंत कधीही सचिन तेंडुलकरला जुगाराची किंवा दारूची ऍड करताना पाहिले नाही.”

दरम्यान, निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर काही पहिल्यांदा टीका केलेली नाही किंवा त्यांना पहिल्यांदा डिवचलेले नाही. याआधी देखील त्यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर टीका केलेली आहे, त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पण निलेश राणेंच्या टीकेला आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी फारसे महत्त्व दिलेले पाहायला मिळाले नाही.


हेही वाचा – VIDEO शूटिंग दरम्यान कोरियन ब्लॉगरचा विनयभंग, आधी पाठलाग करत होता आणि मग…

First Published on: April 19, 2023 8:11 PM
Exit mobile version