घरट्रेंडिंगVIDEO शूटिंग दरम्यान कोरियन ब्लॉगरचा विनयभंग, आधी पाठलाग करत होता आणि मग...

VIDEO शूटिंग दरम्यान कोरियन ब्लॉगरचा विनयभंग, आधी पाठलाग करत होता आणि मग…

Subscribe

काही महिन्यांपूर्वीच मुंबईतल्या खार इथे एका कोरियन महिला यूट्यूबर व्हिडीओ शूट करत असताना तिची छेड काढत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे.

जगभरातील लोक भारतीय संस्कृतीकडे कायम आकर्षित होतात. परिणामी दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक भारतात येतात. आपल्याकडे अतिथी देवो भव: म्हटलं जातं. मात्र, काही समाजकंटकआणि वाईट प्रवृत्तीचे लोक पर्यटकांशी गैरवर्तन करतात. काही महिन्यांपूर्वीच मुंबईतल्या खार इथे एका कोरियन महिला यूट्यूबर व्हिडीओ शूट करत असताना तिची छेड काढत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे.

राजस्थानमधील जोधपूरमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका एका कोरियन महिला ब्लॉगरला एका व्यक्तीने पाठलाग करून त्रास दिला. त्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ स्वतः या महिला ब्लॉगरने शेअर केला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. जोधपूरमधील एका किल्ल्यावर व्हिडीओ शूट करत असताना या महिला ब्लॉगरचा एक पुरुष पाठलाग करत असल्याचे दृश्यांमध्ये दिसत आहे.

- Advertisement -

कोरियन महिला त्या माणसाला जाण्यासाठी रस्ता देते, पण तो तिच्या शेजारी उभा राहतो आणि तिच्या अंगावर येतो. ते पाहून हा कोरियन महिला घाबरते आणि ओरडत पळताना दिसते. हा व्हिडिओ दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांच्यासह अनेक यूजर्सनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना स्वाती मालीवाल यांनी लिहिले की, “आत्ताच एका कोरियन ब्लॉगरचा हा व्हिडीओ समोर आला आहे. जोधपूरमध्ये तिच्यावर लैंगिक छळ झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा अतिशय घृणास्पद आणि लज्जास्पद प्रकार आहे. असे लोक आपल्या महान देशाची प्रतिमा खराब करत आहेत.” आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिल्ली महिला आयोगाने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून जोधपूरमधील एका किल्ल्यावर एका कोरियन महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी तक्रार नोंदवण्याची विनंती केली आहे. “मी लैंगिक छळाच्या या प्रकाराचा तीव्र निषेध करते आणि तुम्हाला दोषींवर त्वरित कारवाई करण्याची विनंती करते. या कृत्यामध्ये सामील असलेल्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करून आणि त्याला त्वरित अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी मी तुम्हाला विनंती करते. पीडितेच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करते, असं DCW प्रमुख स्वाती मालीवाल यांनी या पत्रात लिहिले आहे.

- Advertisement -

जोधपूर पोलिसांनी व्हिडीओची दखल घेत त्या व्यक्तीला अटक केली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, “जोधपूर पूर्वच्या डीसीपी डॉ. अमृता दुहान यांनी सांगितले की, “एका परदेशी महिला पर्यटक ब्लॉगरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती की, जोधपूरमध्ये एका व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. या माहितीची दखल घेत आम्ही तपास केला आहे.” त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक केली.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -