संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंवर टांगती तलवार, अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धावाधाव

संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंवर टांगती तलवार, अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धावाधाव

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात ॲड. राजेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामिनावर पहीली सुनावणी २७ डिसेंम्बर रोजी होणार होती. मात्र आता ही सुनावनी उद्या २८ डिसेंम्बर रोजी होणार असल्याची असल्याची माहीती ॲड. रावराणे यांनी दिली आहे. आयपीसी ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यात नितेश राणे यांना अटकपूर्व जमीन जिल्हा न्यायालयात मंजूर होणार की त्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागणार हे चित्र उद्या २८ डिसेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.

सिंधुदुर्गात शिवसेना आक्रमक

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक आणि शिवसैनिकावरील हल्ला प्रकरण जिल्ह्यात चांगलंच तापू लागले आहे. आज शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील सूत्रधाराला अटक करा अशी मागणी करण्यात आली. तर जिल्हा बँकेचे मतदार बेपत्ता असलेल्या प्रमोद वायंगणकर यांचा शोध घ्या अशी मागणीही करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी तापसी अंमलदार कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना निवेदन सादर केले. दरम्यान निवेदन सादर करण्यासाठी पोलिस ठाण्याकडे जात असताना शिवसैनिकानी “दादा, मला वाचवा, कॉक …कॉक …अशा घोषणा दिल्या.


हेही वाचा – संतोष परब हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्गात शिवसेना आक्रमक, मुख्य सूत्रधाराच्या अटकेच्या मागणीसाठी केले आंदोलन


 

First Published on: December 27, 2021 8:32 PM
Exit mobile version