माझ्याकडे पैशांची कमी नाही, नरीमन पॉईंट ते दिल्ली १२ तासात जोडतो – नितीन गडकरी

माझ्याकडे पैशांची कमी नाही, नरीमन पॉईंट ते दिल्ली १२ तासात जोडतो – नितीन गडकरी

माझ्याकडे पैशांची कमी नाही, नरीमन पॉईंट ते दिल्ली १२ तासात जोडतो - नितीन गडकरी

माझ्याकडे पैशांची कमी नाही, माझ्या खात्याकडे पैसे आहेत. दिल्लीला नरीमन पॉईंटशी जोडून देण्याचं काम मी केरेल, अजितदादा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रस्ताव तयार करा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. पुण्यात सिंहगड रोडवरली उड्डाणपुलाचे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी उपस्थित होते. गडकरींच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. गडकरींनी अनेक विकासकामे आणि रस्ते, मेट्रो तसेच उड्डापुलांच्या कामाची माहिती दिली. राज्य सरकारने साथ आणि सकारात्मक भूमिका दाखवल्यास महाराष्ट्रात उत्तम विकासकामे केंद्राच्या मदतीने करु असेही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई ते दिल्लीच्या हायवेचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात येणार असल्याचे गडकरींनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यातील सिंहगड रोड उड्डाणपुल भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित लावली होती. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये गडकरींनी निधीवरुन टोला लगावला आहे. दिल्लीत मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मी विकासासाठी कटिबद्ध आहे. मुंबईतील बांद्रा-सी लिंकशी इमोशनल नातं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात मला पुलाची जबाबदारी मिळाली होती. त्यावेळी खुप काही शिकायला मिळाले होते. तोच सी लिंक वसई-विरारपर्यंत घेऊन जाण्याची माझी फार इच्छा होती परंतु राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे ते शक्य झाले नाही असे नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

मुंबई ते दिल्ली महामार्गाचे काम ७० टक्के पुर्ण झाले आहे. आता महाराष्ट्रातील रस्ता बाकी आहे. हा रस्ता जेएनपीटीपर्यंत नेणार आहे. अजित पवार यांनी मागणी केली की, वसई-विरारपासून वरळीपर्यंत हा महामार्ग जोडण्यात यावा यामुळे नरीमन पॉईंटवरुन दिल्ली १२ तासात गाठता येईल. यावर गडकरींनी म्हटलं आहे की, माझं वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं आहे. माझ्या खात्याकडे खूप पैसे आहेत. दिल्लीला नरीमन पॉईंटशी जोडून देण्याचं काम मी करेल फक्त तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन प्रस्ताव तयार करा असा टोला गडकरींनी अजित पवारांना लगावला आहे.

..म्हणून मी मंत्र्यांचे हॉर्न बंद केले

वाहनांचे हॉर्न, अॅम्बुलन्स सायरनचा आवाज बदलणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. पुण्यात येताना खुप दुःख होतं. पुर्वी माझी बहीण पुण्यात राहत होती. तेव्हा पुण्यात यायचो तेव्हाची हवा शुद्ध होती. आताचे पुणे प्रदूषित झालं आहे. जल, वायू आणि ध्वनी याबाबत इंटरनॅशनल बेंचमार्क आहेत. त्याचे पालन करुन सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले. लाल दिवे काढले, मी रोज सकाळी उठतो काही दिवसांनी मला लक्षात आलं की ध्वनी प्रदूषणामुळे खुप त्रास होत आहे. त्यामुळे आता ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मी ऑर्डर काढून क्लासिक संगीताची ट्यून अँम्ब्युलन्सवर लावणार आहे. ते कानाला ऐकायला चांगल वाटेल तसेच गाड्यांचे हॉर्नदेखील कर्कश आहेत त्यामुळे त्यांचाही आवाज बदलणार असल्याचे गडकरी यांनी म्हटलं आहे.

शेतकरी माझी पेट्रोल बंद करण्याची इच्छा पूर्ण करु शकतात

देशातील शेतकरी माझ्या आयुष्यातील एक इच्छा पूर्ण करु शकतात ती म्हणजे पेट्रोल-डिझेल बंद करणं, मी वाहन उद्योजकांना म्हटलं आहे जोपर्यंत इथेनॉल स्कूटर बनवत नाही. तोपर्यंत माझ्यापर्यंत येऊ नका, मी तुमचं काम करणार नाही. त्या दोघांनी इथेनॉल इंजिन बनवलं आहे. वाहनांमध्ये शंभर टक्के इथेनॉल, शंभर टक्के पेट्रोल हा पर्याय ठेवला तर मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होणार नाही. आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीपासून सुटका होईल असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : अजित पवारांनी घेतली रस्ते कंत्राटदारांची शाळा, सहनशीलतेचा अंत पाहू नका…


 

First Published on: September 24, 2021 2:09 PM
Exit mobile version