शिवसेनेसमोर झुकणार नाही – अमित शहा

शिवसेनेसमोर झुकणार नाही – अमित शहा

अमित शाह

लोकसभेसाठी शिवसेना – भाजप युती होणार की नाही? याची सध्या चर्चा जोरात सुरू आहे. पण, आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना – भाजप युतीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. युतीसाठी शिवसेनेसमोर झुकणार नाही. शिवाय, आहे त्यापेक्षा काहीही गमावून युती होणार नाही अशी भूमिका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतली आहे. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील भाजपा खासदारांची बैठक दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पार पडली. त्यावेळी त्यांनी युतीच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली. यावेळी नारायण राणे देखील या बैठकीसाठी हजर होते. युतीसाठी शिवसेनेची वाट पाहू. पण, झुकणार नाही असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसंच वेळ पडल्यास महाराष्ट्रातील ४८ जागा भाजप लढेल असं देखील अमित शहा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी दिले आहेत. राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही? याबद्दल अद्याप काहीही स्पष्टता नाही.

वाचा – भाजपसोबत अभद्र युती करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करणार – शरद पवार

‘जनता निर्णय घेईल’

पंढरपूर येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ता गेली खड्यात. युतीचा निर्णय जनता घेईल असं म्हटलं होतं. दरम्यान, अमित शहा यांनी देखील २०१८मध्ये उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली होती. त्यानंतर देखील उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. पण, युती होणार की नाही? याचा निर्णय अद्याप तरी अधांतरीच आहे. दरम्यान, अमित शहा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता शिवसेना – भाजप युतीचं काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाचा – भाजप शिवसेनेला सोडून मनसेसोबत युती करणार?

वाचा – शिवसेना- भाजप युती जनताच ठरवणार…

First Published on: January 3, 2019 6:50 PM
Exit mobile version