घरमुंबईभाजप शिवसेनेला सोडून मनसेसोबत युती करणार?

भाजप शिवसेनेला सोडून मनसेसोबत युती करणार?

Subscribe

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर तब्बल २ तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही भेट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच झाल्याचं सांगितलं जात आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना आणि भाजपमधली सुंदोपसुंदी संपत नसतानाच आता भाजप आणि मनसे जवळ येताना दिसत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल २ तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर ही भेट झाल्यामुळे मुंबईतलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पोटात गोळा आल्याचं देखील बोललं जात आहे.

भाजप-मनसे एकत्र येणार?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने स्वबळाची भाषा कायम ठेवल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काय करायचं, असा प्रश्न राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना पडला आहे. भाजपकडून वेळोवेळी जरी शिवसेनेसोबत युती होणारच असल्याचा पुनरुच्चार केला जात असला, तरी शिवसेना मात्र स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम आहे. त्यामुळे भाजपला आता इतर पक्षांसोबत देखील चाचपणी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यातच मनसे देखील राज्यात चाचपडत असताना हे दोन्ही पक्ष नैसर्गिकरित्या एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळेच आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीवर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

- Advertisement -

शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न?

राज ठाकरे यांच्यासोबत आशिष शेलार यांची नक्की कशाविषयी बोलणी झाली? हे जरी अजून गुलदस्त्यातच असले, तरी त्याविषयी तर्क लढवले जाऊ लागले आहेत. भाजप दुसरा पर्याय निवडत असल्याचं एकीकडे बोललं जात असतानाच दुसरीकडे भाजपला दुसरा पर्याय निवडायचा नसूर फक्त शिवसेनेला चुचकारण्यासाठीच भाजप हे सर्व प्रयत्न करत असल्याचं देखील सांगितलं जात आहे. मात्र, भाजपची ही नक्की काय खेळी आहे, हे सिद्ध होण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.


वाचा नक्की कोणतं आहे हे आसन – राज ठाकरेंनी रामदेव बाबांना सुचवलं ‘हे’ आसन!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -