खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे, जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दुसऱ्यांदा हे वॉरंट काढले आहे. शाळा सोडल्याच्या खोट्या दाखला देत जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आरोप आहे.

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी 6 सप्टेंबरच्या न्यायालयीन सुनावणी राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या हजेरीतून सूट देण्याच्या अर्जास परवानगी दिली होती. मात्र 22 सप्टेंबरच्या सुनावणीसही दोघे पुन्हा गैरहजर राहिले.

राणा यांच्या वकिलांनी कोर्टाकडे हजेरीतून सूट आणि आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगितीसाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने दोन्ही अर्ज फेटाळत दोघांविरोधात पुन्हा अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे दोघांना पुढच्या सुनावणीला पुन्हा न्यायालयात हजर राहावं लागले अथवा सत्र न्यायालयात दाद मागावी लागेल. दरम्यान राणा यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र या प्रकरणामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.


 

वेदांत- फॉक्सकॉन गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे आक्रमक; आज तळेगावात ‘जनआक्रोश आंदोलन’


 

 

 

First Published on: September 24, 2022 11:05 AM
Exit mobile version