महावितरणचा भोंगळ कारभार; अवघ्या काही फुटांवर विजेची तार

महावितरणचा भोंगळ कारभार; अवघ्या काही फुटांवर विजेची तार

पिंपरी चिंचवडमधे महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विजेची तार थेट जमिनीला टेकत असून सुस्त महावितरणचे अधिकारी उर्मट उत्तर देत आहे. अवघ्या काही फुटांवर विजेची तार लटकत असताना अधिकारी मात्र डोळेझाक करत आहे, कोणाचा जीव गेल्यानंतर हे प्रशासन जागं होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या चोविसावाडी येथे हा प्रकार सुरू आहे. दरम्यान, शेतकऱ्याने अनेक वेळा अधिकाऱ्याला सांगून ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

महावितरणचे अधिकाऱ्याचे तक्रारीकडे दुर्लक्ष

पिंपरी चिंचवडमधील चोवीसावाडी परिसरात रवींद्र ज्ञानेश्वर येळवंडे या शेतकऱ्याच्या शेतात चक्क विजेची तार थेट जमिनीपासून काही फुटांवर आली आहे. मनुष्य वस्ती असल्याने त्या ठिकाणाहून अनेक वेळा नागरिक येऊन जाऊन करतात. त्यामुळे जीवितहानी होण्याची भीती शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. संबंधीत शेतकऱ्यांचे तेथे बांधकाम सुरू असून गेल्या अनेक वर्षांपासून तार तशाच प्रकारे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्युत महावितरणचे अधिकारी रमेश सुळ यांच्याकडे संबंधित प्रकारा विषयी तक्रार केली आहे.परंतु, याकडे दुर्लक्ष करत डोळेझाक केली असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

महावितरण अधिकाऱ्याची उडवा उडवीची उत्तरं

आषाढी वारी निमित्त श्री संत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथे काही दिवसात होणार असून लाखो भाविक भक्त हे आळंदीत दाखल होतात. त्यांची सोय विविध ठिकाणी केली जाते. यापैकी, शेतकरी येळवंडे हे देखील त्यांची सेवा करत असतात. त्यांचं घर आणि शेत हाकेच्या अंतरावर आहे. विजेच्या तारा जमिनीपासून काही फुटांवर येऊन पोहचल्याने काही अघटित घडू नये अस त्यांचं म्हणणं असून लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. दरम्यान महावितरण अधिकारी रमेश सुळ यांच्याशी बोलताना त्यांनी “प्रेससाठी कोणतीच माहिती देऊ शकत नाही. तुम्ही आमच्या पीआरओ शी संपर्क करा” अशाप्रकारे उडवा उडवीची उत्तरं दिली.

First Published on: June 20, 2019 5:21 PM
Exit mobile version