करोना व्हायरस : आता पाकिस्तानमध्ये ही लॉकडाऊन

करोना व्हायरस : आता पाकिस्तानमध्ये ही लॉकडाऊन

पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान

इराणच्या सीमेलगत सिंध प्रांतात संशयित करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ असल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवादाला नेहमी पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानच करोनामुळे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये करोनाग्रस्तांची संख्या ८७८ वर पोहोचली आहे. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. अनेक देशात लॉकडाऊन असतानाही पाकिस्तानने लॉकडाऊन केल्यास जनता गरिबीने उपाशी राहिल, त्यामुळे लॉक डाऊन पाळला जात नव्हता. परंतु भारताने २१ दिवसाचा लॉक डाऊनचा निर्णय घेतल्यावर आणि इराण सीमेलगत सिंध प्रांताची परिस्थिती पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सुद्धा देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. इम्रान खान यांनी पंजाब, खैबर-पख्तुनख, बलुचिस्तान, गिलगिट-बल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तत्पूर्वी करोनाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या सिंधमध्ये पूर्णपणे लॉक डाऊन केले होते. अधिक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती आहे. सेनेचे जवान सक्तीची अंमलबजावणी कशी होईल, यावर लक्ष केंद्रित करून आहेत, अशी माहिती पाकिस्तान सेनेचे मेजर जनरल बाबर इफ्तीखार यांनी दिली आहे.

करोनाशी दोन हात करण्यासाठी पाकिस्तान गृहमंत्रालयाने सेनेची मदत मागितली होती. पाकिस्तानी सैन्याने या कठीण प्रसंगात स्थानिक प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे. कालपर्यंत इम्रान खान लॉकडाऊन करण्यास तयार नव्हते. लॉक डाऊन केल्यास मजूर आणि गरीब जनता घरात उपाशी मरेल, अशी भीती त्यांना सतावत होती.

First Published on: March 25, 2020 9:49 AM
Exit mobile version