आकडा आणि बहुमत फार चंचल, मुंबईत आल्यावर आमदारांच्या श्रद्धेची खरी कसोटी, संजय राऊतांचा इशारा

आकडा आणि बहुमत फार चंचल, मुंबईत आल्यावर आमदारांच्या श्रद्धेची खरी कसोटी, संजय राऊतांचा इशारा

मुंबईः शिवसेनेचा आकडा कमी झालेला आहे. लोकशाही आणि बहुमत हे आकड्यांवर चालते. पण मी पुन्हा सांगतो, आकडा आणि बहुमत फार चंचल असतं. ज्या दिवशी ते आमदार मुंबईत येतील, त्यानंतर त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. संजय राऊतांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ही आता कायदेशीर लढाई आहे. काही नियम आहेत. काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. आता ही कायदेशीर लढाई आहे. काय होतंय ते पाहू ना, शेवटी त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. त्यांच्याबरोबर काही आमदार आहेत. कोण म्हणतात 40 आहेत, कोण म्हणतात 140 आहेत. जे असतील ते असतील, पण महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकसंध आहेत. शिवसेनेचा आकडा कमी झालेला आहे. लोकशाही आणि बहुमत हे आकड्यांवर चालते. पण मी पुन्हा सांगतो, आकडा आणि बहुमत फार चंचल असतं. ज्या दिवशी ते आमदार मुंबईत येतील, त्यानंतर त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल, असंही ते म्हणालेत.

सरकारचा सभागृहात हा विषय येईल तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूनं आमदारांचा कौल असेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आता लोक धमकी देतायत. शरद पवारांना धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माज वाढलेला आहे. या लोकांनी पूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आम्हाला सगळ्यांना धमक्या दिलेल्या आहेत. धमक्या देऊ द्या ही ज्याची त्याची संस्कृती आहे. पण ही भाजपची संस्कृती आहे का?, शरद पवार साहेबांना घरी जाऊ देणार नाही, असा धमकी देणारा कोणी महाराष्ट्रात असेल, तर त्याचा विचार मोदी आणि शहांना करावा लागेल. या देशात लोकशाही आहे, त्यांना स्वातंत्र्य आहे. शरद पवारांसारख्या नेत्यांना पंतप्रधान मोदीजी मानतात, जगभरात मानतात, जे महाराष्ट्राचे सुपुत्र आहे, चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवण्यासाठी जशा धमक्या देत असाल, आम्हाला द्या धमक्या आम्ही समर्थ आहोत. पण त्यांच्या वयाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या तपस्येचा जर तुम्हाला आदर नसेल, तर मला असं वाटतं आपण मराठी म्हणवून घ्यायला नालायक आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदेंनी पाठीमागे महाशक्ती असलेल्या विधानावर संजय राऊत म्हणाले, चांगली गोष्ट आहे, कोणत्या महाशक्तीत विलीन व्हायचा हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना हा महासागर आहे, हा कायम उसळलेला असतो. महासागर कधी आटत नाही. लाटा येतात आणि लाटा जातात ही सुद्धा लाट निघून जाईल, जे गेलेत त्यांना पश्चात्ताप होईल, असा टोलाही त्यांनी लगावलाय.


हेही वाचाः उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, जिल्हाप्रमुखांच्या बोलावल्या बैठका

First Published on: June 24, 2022 10:38 AM
Exit mobile version