OBC आंदोलन : नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, बावनकुळेंचा ठाकरे सरकारला इशारा

OBC आंदोलन : नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, बावनकुळेंचा ठाकरे सरकारला इशारा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी समाजाला सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला आरक्षणच द्यायचे नाही असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भाजपकडून राज्यभरात प्रत्येक तालुक्यात असे १००० ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. औरंगाबाद,नाशिक, पुणे, कोल्हापुरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. तर नागपुरमध्ये चंद्रेशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वा आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी जर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर ओबीसी जनता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रात १००० ठिकाणी भाजपचे ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर आंदोलन सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात या सरकारने बाजू न मांडल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं या सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपासला आणि म्हणून राज्यातील ५२ टक्के ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकराच्या विरोधात संघर्ष करणार असल्याचे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

नेत्यांना फिरू देणार नाही

ओबीसी जनता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असे आम्ही वचन घेतलं आहे. ओबीसी समाजाने महाराष्ट्र सरकारचा धिक्कार केला आहे. महाविकास आघाडी सरकारला आरक्षण द्यायचे नाही आहे. यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ओबीसी समाजात चिड निर्माण झाला असल्यामुळे पुतळा जाळण्यात आला आहे. ओबीसी समाजाचे लोकं चिडले आहेत जर सरकार ऐकले नाही तर महाराष्ट्रात आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. धार्मिक कार्यक्रम,मेळावे आणि गर्दी करण्यात मनाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवत गर्दी करुन आंदोलन केल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


हेही वाचा : फडणवीसांनी निवडणुका पुढे ढकल्यामुळे OBC आरक्षण धोक्यात, नाना पटोले यांचा भाजपवर निशाणा


 

First Published on: September 15, 2021 1:38 PM
Exit mobile version