Omicron Variant: फॉरेन रिटर्न सहा पॉझिटिव्ह रुग्णांनी वाढवले महाराष्ट्राचे टेन्शन; जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल अजूनही प्रतीक्षेत

Omicron Variant: फॉरेन रिटर्न सहा पॉझिटिव्ह रुग्णांनी वाढवले महाराष्ट्राचे टेन्शन; जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल अजूनही प्रतीक्षेत

Omicron Variant: फॉरेन रिटर्न सहा पॉझिटिव्ह रुग्णांनी वाढवले महाराष्ट्राचे टेन्शन; जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल अजूनही प्रतीक्षेत

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनची दहशत संपूर्ण जगभरात पसरली आहे. काही देशांनी दक्षिण आफ्रिकेसह परदेशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. तर काही देशांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने सुद्धा परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. तसेच राज्यपातळीवर देखील परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात दक्षिण आफ्रिकेसह ओमिक्रॉनबाधित देशातून आलेल्या ६ प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे.

काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमधून डोंबिवलीत परतलेल्या प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले असून त्याचे अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहेत. याच दरम्यान आता दक्षिण आफ्रिका आणि ओमिक्रॉनबाधित देशातून राज्यात परतलेले आणखीन ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. यांचे देखील नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात आता ओमिक्रॉनबाधित देशातून आलेल्या प्रवाशांची संख्या ६ झाली आहे. त्यामुळे या ६ जणांमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.

पण मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही ‘एस’ जनुकाची तपासणी करणारी विशेष आरटी-पीसीआर चाचणी वापरून ओमिक्रॉन बाधित देशातून आलेल्या प्रवाशाच्या नमुन्याची चाचणी केली आहे. त्याच्या चाचणीत एस जनुके असल्याचे दिसून आल्याने त्याच्यात ओमिक्रॉन व्हेरियंट असण्याची शक्यता नाही.

ओमिक्रॉनबाधित देशातून कोण-कोणत्या शहरात किती रुग्ण परतले?
मुंबई – १
डोबिंवली – १
मिरा भाईंदर – १
पुणे – १
पिंपर-चिंचवड – २


हेही वाचा – Omicron Variant Guidelines: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुधारित गाईडलाईन्सची आजपासून अंमलबजावणी


 

First Published on: December 1, 2021 10:01 AM
Exit mobile version