महाराष्ट्रातील आणखी एक संस्था गुजरातने पळवली

महाराष्ट्रातील आणखी एक संस्था गुजरातने पळवली

राष्ट्रीय खणीकर्म आरोग्य संस्थेचे राष्ट्रीय आरोग्य संस्थेत विलीणीकरण करत केंद्र सरकारने महाराष्ट्रातून ही संस्था आता गुजरातमध्ये पळवली आहे. खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यासोबतच सर्व स्तरातील व्यावसायिकांच्या आरोग्यासंदर्भात संशोधन व सेवा पुरविण्यासाठी नागपूर येथे ही संस्था कार्यरत होती. कोरोनाच्या अभुतपुर्व संकटातही ही संस्था व तेथील कर्मचारी नागपूर येथून अहमदाबाद आणि बेंगलेरु येथे स्थलांतरीत करण्याची प्रक्रीया केंद्रीय प्रशासनाने सुरु केली असून येथील अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या करून त्यांना तात्काळ प्रभावाने अहमदाबाद व बंगलेरू या बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायला भाग पाडले आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय असून देशातील बहुतांश खाणि या महाराष्ट्रासह मध्य भारतात असल्याने या संस्थेचे प्रादेशिक प्रयोगशाळा व कार्यालय नागपूर येथेच ठेवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या व मानवाधिकार अभ्यासक डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी केली आहे.

राष्ट्रीय खणीकर्म आरोग्य संस्थेचे  (एनआयएमएच) ही भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) अंतर्गत आहे. पण आता या संस्थेचे विलीणीकरण राष्ट्रीय आरोग्य संस्था (एनआयओच) मध्ये करण्यात आले आहे. महाराष्ट्रच नव्हे तर मध्य भारतासाठी भूषण ठरलेली संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. खाण कामगारांच्या तसेच खाणीलगत राहणारे रहिवास्यांचे आरोग्य, जमीनीचे कंपन, ध्वनी, वायु व जल प्रदूषण, धूळ इत्यादी पासून होणारे रोग व ते होऊ नयेत यासाठी संशोधनासोबतच तांत्रिक सेवाही ही संस्था पुरवत होती, महाराष्ट्रासह मध्य भारतातील राज्यात खाणींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच सर्वांना सोयीचे होईल या हेतुने संपुर्ण भारतात एकमेव असलेली ही संस्था नागपूर येथे खाण मंत्रालयाच्या अंतर्गत 2002 पासून कोलार गोल्ड फिल्ड कर्नाटक वरून स्थलांतरीत करण्यात आली. सुसज्ज प्रयोगशाळेसह याप्रकारची सेवा देणारी संपुर्ण भारतातील ही एकमेव संस्था होती. पण ही संस्था आता गुजरातमध्ये केंद्राने पळविली आहे. अॅडव्होकेट अंजली साळवी मागणीची तात्काळ दखल घेत घेत खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्राकडे पाठपुरावा सुरु केला आहे.

तब्बल एक वर्षापासून डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी ही संस्था नागपुर येथेच राहावि यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले. खासदार बाळू धानोरकर यांच्या मार्फ़त हा प्रश्न संसदेतही मांडला असतांनाही केंद्र शासनाने या संस्थेची विलीनीनरण प्रक्रीया पुर्ण केली. त्यामुळे संस्था नाही तर किमान या संस्थेचे प्रादेशिक कार्यालय तिच्या मुळ उद्देशांसह नागपूर येथेच असावे यासाठी त्यांनी नवी दिल्ली आणि मुंबई येथे खासदार सुप्रिया सूळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेत त्यांना याबाबत संपुर्ण माहिती देत चर्चा केली. या मागणीची तात्काळ दखल घेत त्यांनीही पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र पाठवून या संस्थेचे प्रादेशिक प्रयोगशाळा व कार्यालय नागपूर येथेच ठेवण्याची मागणी केली आहे.

खणन क्षेत्राचे राष्ट्रीय अर्थ व्यवस्थेत महत्वाचे स्थान असताना या क्षेत्रातील कामगारांसाठी च्या या संस्थेचे सरकारी काटकसरीच्या नावावर अस्तित्व संपवित असून या क्षेत्रातील कामगारांच्या आरोग्याबाबत विलिनिकरणानंतर केंद्रसरकारच्या काःइही उपाययोजना नाहीत. मुळात जेथे खाणींची संख्याच कमी आहे तेथे ही संस्था विलीनीकरण व स्थलांतरीत करणे  हा मध्य भारतातील आणि त्यातही प्रामुख्याने महाराष्ट्रातील खाण कामगारांवर अन्याय खाणित कार्यरत कामगारांच्या आरोग्याबाबत सरकार उदासिन असल्याचे लक्षात येते. याबाबत राज्यातील सर्व केंद्रीयमंत्री मौन धारण करुन असल्याने डॉ. साळवे यांनी अनेक लोकप्रतिनिधींना या संस्थेचे प्रादेशिक कार्यालय त्याच्या मुळ उद्देशांसह नागपुरातच असावे यासाठी पुढे येण्याची विनंती केली आहे. आहे. महाराष्ट्रासहित मध्य भारतातील राज्यातील खाण कामगारांच्या आरोग्यासोबतच सर्व स्तरातील व्यावसायिकांच्या आरोग्याच्या संशोधन व सेवा पुरविण्यासाठी ही संस्था नागपुरात असणे उपयुक्त ठरेल असेही डॉ. अंजली साळवे यांनी स्पष्ट केले आहे. ही संस्था नागपूर येथेच असावी यासाठी राज्यातील सर्व लोकप्रितिनिधींनी पुढे येण्याचे आवाहनही डॉ. साळवे यांनी केले आहे.

First Published on: July 27, 2020 2:00 PM
Exit mobile version