CoronaVirus: अहमदनगरमध्ये आढळला तिसरा ‘करोना’ पॉझिटिव्ह

CoronaVirus: अहमदनगरमध्ये आढळला तिसरा ‘करोना’ पॉझिटिव्ह

प्रातिनिधिक छायाचित्र

अहमदनगरमध्ये आणखी एक करोना बाधित रुग्ण आढळल्याने नगरमधील रुग्णांची संख्या आता तीनवर गेली आहे. विशेष म्हणजे या रुग्णाने कोणताही परदेश प्रवास केलेला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे. तर सर्वात पहिल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्याची पुन्हा चाचणी होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

२७७ संशयितांना होम क्वॉरंटाइन

नगरमध्ये सुरुवातीला एक करोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर त्यापाठोपाठ जिल्ह्यातून दुसरा रुग्ण सापडला होता. त्यामुळे करोना बाधितांची संख्या दोन झाली होती. मंगळवारी आणखी एका रुग्णाची त्यात भर पडली आहे. नगर जिल्ह्यातून सध्या २७७ संशयितांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तर दहा संशयित रुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असून नऊ जणांचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी आज एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने नगरमध्ये चिंता व्यक्त होत आहे. आज आढळून आलेला रुग्ण स्थानिक असून त्याला संसर्गातून बाधा झाल्याचे पुढे येत आहे. या रुग्णाने कोणताही परदेश प्रवास केलेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन आता यासंदर्भात अधिक सतर्क झाले असून यापूर्वी जे दोन करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यातील पहिल्या रुग्णाची एक चाचणी निगेटीव्ह आलेली होती. बदलत्या निकषानंतर आणखी एक चाचणी होणार असून त्याचा अहवाल यायचा आहे. त्याच्यासह दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी आता संचारबंदी काळात आपल्या घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.


हेही वाचा – धक्कादायक! ‘करोना’ पाठोपाठ चीनमध्ये नवा ‘हंता’ व्हायरस; एकाचा मृत्यू


 

First Published on: March 24, 2020 7:23 PM
Exit mobile version