धक्कादायक! ‘करोना’ पाठोपाठ चीनमध्ये नवा ‘हंता’ व्हायरस; एकाचा मृत्यू

करोना पाठोपाठ आता चीनमध्ये एका नवीन व्हायरसने डोकेवर काढले असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

Michigan's first human hanta virus case identified in Washtenaw County america
hanta virus : सावधान! अमेरिकेत आता हंता व्हायरसची एंट्री, घरकाम करणाऱ्या महिलेला झाला संसर्ग

करोना व्हायरसने जगभरात अक्षरश: थैमान घातले आहे. चीनच्या वुहानमधून पसरणाऱ्या करोना व्हायरसने जगभर हाहाकार झाला आहे. या व्हायरसची अनेकांना लागण झाली असून चीनने जन्माला घातलेल्या व्हायरसने आतापर्यंत चीनमध्ये ३ हजार ५०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमध्ये लोक या व्हायरसपासून सुटकेचा निश्वास घेत नाही तोच आता अजून एक नवीन व्हायरस समोर आला आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अशी माहिती आली उघडकीस

करोना व्हायरसमुळे आतापर्यंत इटलीमध्ये अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चीनला मागे टाकत इटलीमध्ये तब्बल ६ हजार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, असे असले तरी देखील चीनच्या वुहानमधून नव्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही, असे असताना आता चीनमध्ये एका नव्या व्हायरसने डोके वर काढले आहे. युन्नान प्रांतामध्ये एका व्यक्तीचा सोमवारी एका नव्या व्हायरसने मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती बसमधून प्रवास करीत होती. दरम्यान, त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या ३२ प्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असल्याची माहिती चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

हंता नावाचा आहे हा व्हायरस

करोनासारखाच हा व्हायरस असून हंता असे या व्हायरसचे नाव आहे. तसेच हा करोना व्हायरस सारखा घातक नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण करोना व्हायरस हवेद्वारे पसरतो. तर हंता हा व्हायरस उंदीर आणि खार यांच्या संपर्कात आल्यास होतो. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल आणि ती व्यक्ती हंता व्हायरसच्या संपर्कात आल्यास याचे संक्रमण होते, असे सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने म्हटले आहे. हंता व्हायरस जीवघेणा असून याची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ३८ टक्क्यांनी असते. याची लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, डायरिया ही आहेत.

ही माहिती कळताच अनेकांनी ट्विट करत करोना सारखी भीती व्यक्त केली आहे. तसेच हा व्हायरस करोनासारखाच झाला तर सर्वनाश होईल, असे देखील म्हटले आहे. त्यासोबतच जर चीनच्या लोकांनी जनावरांना खाणे बंद नाही केले तर असेच घडत राहिल, असे देखील म्हटले आहे.


हेही वाचा – Coronavirus – करोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, नागरिकांना दिलासा!