इंजिनिअर तरुणीला एकतर्फी प्रेमातून जीवे मारण्याची धमकी

इंजिनिअर तरुणीला एकतर्फी प्रेमातून जीवे मारण्याची धमकी

गहुंजे गावच्या सरपंच शीतल बोकडे यांना पतीने केली जीवे मारण्याचा प्रयत्न

हिंजवडी मधील एका २४ वर्षीय कम्प्युटर इंजिनिअर तरुणीला एक तर्फी प्रेमप्रकरणातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पीडित तरुणी ज्या कंपनीत काम करते त्यांच कंपनीत आरोपी देखील कम्प्युटर इंजिनिअर आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने तरुणीला गोळ्या घालण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

एकाच कंपनीत होते कामाला

जितेंद्र सोलंकी असं या धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानचा असून हिंजवडी येथे एका कंपनीमध्ये कम्प्युटर इंजिनिअर म्हणून काम करतो. सध्या तो पुण्यातल्या वाकड येथे राहतो. ज्या कंपनीत जिंतेंद्र काम करतो त्याच कंपनीतील एका तरुणीवर त्याचे एकतर्फी प्रेम आहे. यातूनच त्याने पीडित तरुणीला गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली होती. पीडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात धमकावणे आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

प्रेमाला नकार दिल्याने दिली धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र सोलंकी या २४ वर्षीय तरुण त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीवर एक तर्फी प्रेम करत होता. ते दोघे ही हिंजवडी मधील कॉग्निझन्ट या कंपनीत कामाला होते. त्यामुळे त्यांची एका प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली. त्या दरम्यान त्यांची मैत्री झाली. मात्र त्यापुढे त्याने तरुणीवर प्रेम असल्याचे सांगितले मात्र तिने नकार दिला होता. परंतु जितेंद्र हा तरुणीला वारंवार त्रास देत होता. तरुणीने यासंबंधी कंपनी प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर देखील जितेंद्र हा तरुणीला त्रास देत होता.

आरोपीचा शोध सुरु

तरुणीने प्रेमाला नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या जितेंद्रने फोनवरुन पीडित तरुणीला गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या. जितेंद्र सोलंकीने नोकरी सोडली आहे. परंतू तो पीडित तरुणाला फोन आणि व्हॉट्स्अॅपवर धमक्यांचे मॅसेज करत होता. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने शेवटी वाकड पोलीस ठाण्यात जितेंद्रविरोधात तक्रार केली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. वाकड पोलीस अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.

First Published on: November 11, 2018 3:22 PM
Exit mobile version