२१ मे सकाळी १० वाजेपासून रेल्वे तिकीट आनलाईन बुकिंग सुरु

२१ मे सकाळी १० वाजेपासून रेल्वे तिकीट आनलाईन बुकिंग सुरु

Online booking of train tickets starts from 10 am on 21st May

लाॅकडाऊनमुळे संपुर्ण देशातील रेल्वे प्रवाशी वाहतूक बंद झाली होती, मात्र रेल्वे मंत्रालयाने १ जूनपासून देशभरात १०० महत्वाच्या रेल्वे मार्गावरुन रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.

देशभरात वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवरुन १०० रेल्वे अप आणि १०० डाऊन अशा दोनशे रेल्वे धावणार आहेत. देशभरात गुरुवारी (दि.२१) सकाळी १० वाजेपासून आॅनलाईन बुकिंग केली जाणार आहे. तिकिट काढण्यासाठी कोणत्याही रेल्वे स्थानकावर व्यवस्था नसून लोकांनी तिकिटासाठी रेल्वे स्थानकावर निष्कारण गर्दी करु नये, फक्त आनलाईन बुकींग केलेले व कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात सोडण्यात येईल. आरक्षण केले असले व वेटींग तिकीट असले तरीही कोणीही रेल्वे स्थानकाकडे येऊ नये, त्याबाबतचे तिकीट कन्फर्मेशन आनलाईन पहावे किंवा स्थानकाबाहेर गाडी येण्याअगोदर चार तासआधी चार्ट लावला जाईल, ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म नसेल अशा प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
First Published on: May 21, 2020 1:53 AM
Exit mobile version