TET Exam Scam: २०१३नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे राज्य परीक्षा परिषदेचे आदेश

TET Exam Scam: २०१३नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे राज्य परीक्षा परिषदेचे आदेश

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा (TET Exam Scam)  समोर आल्यानंतर आता राज्यातील शिक्षकांसाठी राज्य परीक्षा परिषदेने नवीन आदेश काढले आहेत. राज्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्र परीक्षा प्रमाणपत्रांची आता पडताळणी केली जाणार आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आले आहे. ७ जानेवारी २०२२ पर्यंत शिक्षकांना प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहेत. प्रमाणपत्र ठरलेल्या वेळेत सादर न केल्यास शिक्षकांवर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद, महापलिका आणि नगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहत. ७ जानेवारीपर्यंत शिक्षकांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. कागदपत्रे देताना शिक्षकांना त्यांचे संपूर्ण नाव, MAHATET परीक्षेचा बैठक क्रमांक. पेपर क्रमांक, पास झालेल्याचे वर्ष,परीक्षेत मिळालेला शेरा अशी सगळी माहिती राज्य परीक्षा परिषदेसमोर सादर करावी लागणार आहे.

राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना राज्यातील म्हाडा पेपर फुटी प्रकरणातील चौकशी सुरु असताना पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा प्रकरणात अटक करण्यात आली. तुकाराम सुपे यांनी आर्थिक गैरव्यवहार करुन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तुकाराम सुपेने विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकीट सुनील घोलप हा त्यांच्या कार्यालयातील गाडी चालक इतरांना पाठवत असल्याचे तपासून निष्पन्न झाले होते.

या प्रकरणात तुकाराम सुपेसह म्हाडाची परीक्षा घेण्याची जबाबदारी ज्याच्यावर देण्यात आली होती तो जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रीतेश देशमुख याला देखील अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीअंती २०२०मध्ये राज्यात झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाला होता आणि यात तुकाराम सुपेचा पुढाकार असल्याचे समोर आले.


हेही वाचा – TET परीक्षा गैरव्यवहार प्रकरण: तुकाराम सुपेंच्या घरातून दोन कोटींहून अधिकची रोकड अन् सोनं जप्त

First Published on: January 5, 2022 10:16 PM
Exit mobile version