मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध; मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध; मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

ठाणे : मराठा समाजाला  आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असा पुर्नउच्चार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मराठा बाधवांनी आत्महत्या करू नये, अशी विनंती आणि आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी आज माध्यमांशी बोलाताना केली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात क्यूरेटिव पिटीशन दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मराठा तरुणांच्या आत्महत्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मराठा बांधव आत्महत्या करत आहेत. ती अतिशय दुःखदायक आणि वेदनादायी घटना आहे. मराठा समाजाच्या मुलाने आत्महत्य करणे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राला माझा परिवार समजतो. यामुळे ज्या आत्महत्या झाल्या आहेत. त्या अतिशय दुर्दैवी असून माझी मराठा समाजातील बांधवाना विनंती करतो की,  महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी कटीबद्ध आहे.

हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा; सरकारी जाहिरातीवर अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव पिटीशन दाखल 

“मागच्या युतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिले. उच्च न्यायालयात आरक्षण टिकले. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टीकले नाही. मराठा आरक्षणाच्या ज्या बाबी आहे. त्या सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थितीत मांडता आल्या नाहीत. पण सर्वोच्च न्यायालयाने ज्या तुटी दाखविल्या आहेत. त्यावेळी मराठा समाज न्यायालयात मागास असल्याचे सिद्ध करताना अपयश आले होते. त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव पिटीशन दाखल केलेली आहे. सुदैवाने 13 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या खंडपीठाने क्यूरेटिव पिटीशन दाखल करून घेतली आहे. मराठा आरक्षणामध्ये लक्ष घालून. हे प्रकरण लिस्टिंग करू ऐकतो. त्यामुळे ही बाब मराठा समाजाला दिलासा देणारी आहे. मराठा आरक्षणाचे तथ्य तज्ज्ञ वकिल मांडतील”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – Maratha Reservation : आरक्षण घेऊनच गावात यायचं नाही तर…; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

युद्ध पातळीवर काम सुरू

कुणबी जातप्रमाण पत्र देण्यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, “मराठवाड्यात कुणबी जातप्रमाण पत्र देण्यासंदर्भात ज्या जुन्या नोंदी आहेत. त्या मराठा समाजाला कुणबी दाखले मिळाल पाहिजेत, अशी मागणी होती. यासाठी आम्ही न्यायाधीश शिंदे समिती घटित केली असून यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे. यात जुन्या नोंदी तपासून पाच ते सहा हजार जुन्या नोंदी सापडलेल्या आहेत. आजही त्यावर काम सुरू आहे.”

हेही वाचा – कंत्राटी भरतीवरून देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

तरुणांचा जीव ऐवढा स्वस्थ आहे का?

“या माध्यमातून सरकारने शब्द दिल्याप्रमाणे काम सुरू आहे. म्हणून माझी विनंती आहे की, मराठा समाजातील माझ्या भावानो मी आपल्याला आवाहन आणि विनंती करतो. टोकाचे पाऊल उचलू नका. थोडा धीर धरा थोडा वेळ द्या. या सर्व गोष्टी होत आहेत आणि होतील. आपल्या मराठा समाजातील तरुणांचा जीव ऐवढा स्वस्थ आहे का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवाना केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, ” आपल्या मागचे आपल्या परिवारांची प्रत्येकाने केला पाहिजे. यामध्ये सरकार म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल पूर्ण कटीबद्ध आहे. ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी जे जे काही लागेल ते आम्ही नक्की करणार आहोत.”

First Published on: October 22, 2023 5:58 PM
Exit mobile version