घरमहाराष्ट्रMaratha Reservation : आरक्षण घेऊनच गावात यायचं नाही तर...; जरांगे पाटलांचा सरकारला...

Maratha Reservation : आरक्षण घेऊनच गावात यायचं नाही तर…; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Subscribe

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणावर 1 ऑगस्ट रोजी लाठीहल्ला करण्यात आला होता.

जालना (अंतरवाली) : राज्यात मागील अनेक दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. कारण, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची रविवारी (22 ऑक्टोबर) भूमिका स्पष्ट केली असून, ते पुन्हा एकदा 25 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसणार आहेत. एवढेच नव्हे तर कुठल्याही राजकीय नेत्यांना गावात येण्यास मज्जाव करण्यात आला असून, गावात यायचं असल्यास आरक्षण घेऊन या, नाही तर गावात यायचं नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. (Maratha Reservation  If you dont want to come to the village with reservation… Jarange Patil warning to the government)

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणावर 1 ऑगस्ट रोजी लाठीहल्ला करण्यात आला होता. त्यानंतर हे आंदोलन आणखीनच पेटले होते. तब्बल उपोषणाच्या अठराव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर जरांगेंनी त्यांचे उपोषण मागे घेतले होते. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौरा केला. काल बारामतीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज त्यांचे अंतरवाली सराटी गाव गाठून त्यांची भूमिका स्पष्ट केली. 24 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आलेली मुदत संपणार असल्याने त्यांनी आज 22 ऑक्टोबर रोजीच त्यांची भूमिका स्पष्ट करून 25 ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा उपोषण सुरू कऱणार असल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

पाणी, औषध काहीच घेणार नाही

मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत 24 तारखेला संपत आहे. त्यामुळे 25 तारखेपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे. या उपोषणादरम्यान आपण पाणीही घेणार नाही आणि औषधही घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.

हेही वाचा : फ्लाइटमध्ये ‘तो’ बॉम्ब…बॉम्ब म्हणून ओरडला; पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाची EMERGENCY LANDING

- Advertisement -

प्रत्येक गावात उपोषण सुरू करा

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, केवळ अतंरवालीतच नाही राज्यातील प्रत्येक गावामध्ये मराठ्यांनी 25 तारखेपासून साखळी उपोषण सुरू करावे असे आवाहन त्यांनी केले. भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, 25 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण सुरु करत आहे. या काळात गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं नाहीतर गावच्या शिवालासुद्धा शिवू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

हेही वाचा : Maratha Reservation : ‘मलमपट्टी नको, कायमचा उपचार पाहिजे; 24 तारखेनंतरचे आंदोलन सरकारला झेपणार नाही’

उपोषण शांततेच्या मार्गाने

यावेळी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असून कुणीही उग्र आंदोलन करु नये, 28 ऑक्टोबरपासून साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे, त्यामुळे कुणीही आत्महत्या करु नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -