Corona : पुणे बनलं कोरोनोग्रस्तांची राजधानी

Corona : पुणे बनलं कोरोनोग्रस्तांची राजधानी

कोरोना व्हायरस

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर पुणे शहरातील कोरोना विषाणूचा विळखा अधिकच घट्ट होत आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुणे शहरात सोमवारी १ हजार ९३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुणे शहराने कोरोनाबाधितांच्या संख्येत राजधानी दिल्ली शहरालाही मागे टाकत पुणे शहर कोरोनोग्रस्तांची राजधानी बनवी आहे.

पुण्याची रुग्णसंख्या १ लाखाच्या पार

पुण्यातील एकूण रुग्णसंख्या ही १ लाख ७५ हजार १०५ इतकी झाली असून दिल्लीची रुग्णसंख्या १ लाख ७४ हजार ७४८ आहे. त्यामुळे पुणे शहर हे देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले शहर बनले आहे. दरम्यान, देशातील एकूण रुग्णसंख्या ३६ लाखांच्यावर गेली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

पुण्यात सध्या देशातील सर्वाधिक ५२,१७२ Active रुग्ण आहेत. जे मुंबईतील २० हजार आणि दिल्लीतील १५ हजार यांच्यापेक्षा खूपच अधिक आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात आजवर ४ हजार ६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख १८ हजार ३२४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहित राज्याच्या आरोग्यविभागाने दिली आहे.

दरम्यान, राज्यातील पहिला रुग्ण हा पुण्यातच नोंदवला गेला होता. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. मात्र, यामध्ये अद्याप तरी म्हणावे, असे यश आलेले नाही.


हेही वाचा – ‘या’ राज्यात लॉकडाऊन संपला; कंटेनमेंट झोन वगळता Unlock 4 मध्ये कोणतेही बंधन नाहीत


 

First Published on: September 1, 2020 11:49 AM
Exit mobile version