घरदेश-विदेश‘या’ राज्यात लॉकडाऊन संपला; कंटेनमेंट झोन वगळता Unlock 4 मध्ये कोणतेही बंधन...

‘या’ राज्यात लॉकडाऊन संपला; कंटेनमेंट झोन वगळता Unlock 4 मध्ये कोणतेही बंधन नाहीत

Subscribe

मध्य प्रदेशातील कंटेनमेंट झोन वगळता अनलॉक -४ मध्ये कोणतेही बंधन राहणार नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र आता हळू-हळू देश पुन्हा पुर्वपदावर येत आहे. त्यासाठी अनलॉक करण्यात आले असून त्याचे तीन टप्पे संपुर्ण झाले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील कंटेनमेंट झोन वगळता अनलॉक -४ मध्ये कोणतेही बंधन राहणार नाही, अशी माहिती रविवारी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली.  “रविवारी मध्यप्रदेशातील लॉकडाऊन मागे घेण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून घेण्यात आला आहे. लॉकडाऊन केवळ प्रतिबंधित क्षेत्रात लागू होऊ शकतो. केंद्राच्या संमतीशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी लॉकडाऊन लागू केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ”, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

नरोत्तम मिश्रा यांनी असे सांगितले की, “मध्य प्रदेशात किंवा इतर कोणत्याही राज्यातून मध्य प्रदेशात हालचालींवर बंधन येणार नाही. कोणत्याही ई-पास किंवा परवान्याची आवश्यकता देखील भासणार नाही.”

- Advertisement -

“१०० टक्के क्षमतेसह कारखाने सुरू राहतील. धार्मिक स्थळे, मॉल इत्यादी पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. २१ सप्टेंबरपासून थिएटर सुरू होतील. कंटेनमेंट झोन वगळता इयत्ता ९ ते १२ मधील विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी २१ सप्टेंबरपासून स्वेच्छेने शाळेत जाऊ शकतात. २१ सप्टेंबरपासून सामाजिक आणि राजकीय समारंभ, मेळावे आणि क्रीडा स्पर्धांवर कोणतेही बंधन नसेल मात्र कोणत्याही मेळाव्यात १०० हून अधिक लोक असणार नाहीत.”, असेही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी शासनाच्या आदेशाविषयी माहिती देताना ते म्हणाले, “जलतरण तलाव व सिनेमा हॉल ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. पीजी महाविद्यालये आणि पीएचडी महाविद्यालये केंद्र सरकारच्या आदेशावरून संस्था सुरू करू शकतात.”


E-Pass पासून मुक्तता; Unlock 4 जनतेला दिलासा देणारी नियमावली जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -