Pandharpur Assembly By election 2021 Result : पंढरपूरच्या पराभवाचे जयंत पाटलांनी सांगितले कारण, म्हणाले…

Pandharpur Assembly By election 2021 Result : पंढरपूरच्या पराभवाचे जयंत पाटलांनी सांगितले कारण, म्हणाले…

अतिशय चुरशीच्या ठरलेल्या पंढरपूर आणि मंगळवेढा पोटनिवडणूकीत भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभवाचा धक्का दिला. मात्र या पराभवानंतर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया आली आहे. महाविकास आघाडी सरकारमार्फत पंढरपूर पोट निवडणुकीबाबत कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली. पण उशिरा का होईना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमार्फत या निकालावरील प्रतिक्रिया समोर आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना पराभवाचे कारणही सांगितले. ( Pandharpur Assembly By election 2021 : NCP Jayant Patil reaction on Pandharpur defeat, NCP reaction on Pandharpur by election)

काय म्हणाले जयंत पाटील ?

पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने आणि दोन तालुक्‍यातील सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्याने आमचा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत  थोडक्यात पराभव झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी दिली.

पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली.तरीही तेथे आमचा थोडक्यात पराभव झाल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने केरळ येथे तीन जागेवर निवडणूक लढवली होती. आज झालेल्या मतमोजणीत केरळमध्ये दोन ठिकाणी पक्ष यशस्वी ठरल्याची माहिती  पाटील यांनी दिली.

फडणवीस यांची टीका काय ?

पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या निमित्ताने कम्युनिस्ट आणि कॉंग्रेसमुक्त पश्चिम बंगाल झाल्याची परिस्थिती आजच्या निकालातून दिसून येते. भगव्याचा, उजव्या विचारांचा भक्कम पाया आता पश्चिम बंगालमध्ये नागरिकांना स्विकारला आहे, हेच भाजपच्या विजयावरून दिसते असेही ते म्हणाले. पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे दुसऱ्याच्या घरी मुलगा जन्मल्यावर इतकी मिठाई वाटत आहेत, जल्लोष करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली. ममता दीदी या देश जिंकल्याचा आविर्भाव महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आणण्यात आल्याचेही ते म्हणाले.


 

First Published on: May 2, 2021 8:26 PM
Exit mobile version