पंकजा मुंडे कोणाचं भाषण ऐकणार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?

पंकजा मुंडे कोणाचं भाषण ऐकणार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे नेते दोन स्वतंत्र दसरा मेळावा घेत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यामुळे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशी दोन गट वेगवेगळे दसरा मेळावे घेणार आहेत. खरी शिवसेना आमचीच हे सिद्ध करण्यासाठी शिंदे गटाने आपली ताकद पणाला लावली आहे. तर उद्धव ठाकरेही शिवसेनेची आणि बाळासाहेबांची विचारधारा पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्यांकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. या मेळाव्यातून शरसंधान, आरोप प्रत्यारोप, राजकीय तोफ आज शिंदे गटआ आणि ठाकरे गट एकमेकांवर डागतील, यामुळे मेळाव्याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. याबाबत आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी 3 लाख लोक येणार असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईसह राज्यातून प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत येत आहेत.

दरम्यान पंकजा मुंडे यांना तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण ऐकणार? कोणाला प्राधान्य देणार असा प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी दोघांचही भाषण ऐकणार आहे. मी दोघांच्याही मेळाव्याकडे कुतूहलाने बघते. आज खऱ्या अर्थाने दोघांच्याही सीमोल्लंघनांचा दिवस आहे. जनतेच्या प्रश्नांचं, विषयाचे सीमोल्लंघन करतील, जनतेच्या मनाला हात घालतील, अस मत त्यांनी व्यक्त केलं. बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा झाला. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ज्यानंतर पंकजा मुंडे यांनी जनतेला संबोधित केले. खासदार डॉ. प्रीतम मुंडे या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्या आहेत.

दरम्यान मुंबईतील बीकेसीमध्ये होणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी वडापाव, रेल्वे स्थानकावरचं जेवणाच्या पंगती रंगत आहेत. तर नेत्यांसाठीही शाही जेवण असल्याचे बोलले जात आहे. यावरून पंकजा यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. माझा मेळावा शहरातील मोठ्या मेळाव्यांसारखा नाही. इथे कार्यकर्त्यांना मोठी व्यवस्था नाही, खुर्च्या नाहीत, जेवणाची सोय नाही, पण गेली अनेक वर्षे लोक इथे येत आहेत. काही जेवणाचे डब्बेही घरून घेऊन येतात. माझा मेळावा कोणत्या राजकीय पक्षाचा नाही, तो वंचितांचा आहे. असही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.


चलो शिवाजी पार्क…, सूचक ट्वीट करत निलेश राणेंचा शिवसेनेच्या ठाकरे गटाला टोला


First Published on: October 5, 2022 5:14 PM
Exit mobile version