परमबीर सिंह भारतातच, पोलिसांकडून जीवाला धोका

परमबीर सिंह भारतातच, पोलिसांकडून जीवाला धोका

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयने परमबीर सिंह यांना 6 डिसेंबरपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टात परमबीर सिंह यांचे वकील पुनीत बाली यांनी परमबीर सिंह भारतात आहेत.

या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे दिल्यास ते 48 तासात समोर येतील, असे बाली म्हणाले. परमबीर सिंह यांच्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी पुनीत बाली यांनी केली आहे. सीबीआयकडे या प्रकरणांचा तपास गेला तर ते कोणत्याही क्षणी समोर येतील, असे सिंह यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

राज्य सरकारसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का मानले जात आहे. सुप्रीम कोर्टात परमबीर सिंह यांच्या वकिलांनी ते भारतात असल्याचे म्हटल्याने ते परदेशात असल्याचे सांगितले गेल्याचा दावा खोटा ठरला आहे. परमबीर सिंह समोर आल्यास ते अनिल देसमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंह भारतातच असल्याचा दावा पुनीत बाली यांनी कोर्टात केला. ते फरार नाही आहेत. मुंबई पोलिसांची दहशत असल्यामुळे परमबीर सिंह समोर येत नाहीत.परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दावा केला आहे. या खटल्याचा तपास सीबीआयकडून व्हावा, अशी मागणी परमबीर सिंह यांचे वकील पुनीत बाली यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. जर मी चूक केली असेल तर माझ्यावर देखील कारवाई व्हावी, असे सिंह यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात सांगण्यात आले.

First Published on: November 23, 2021 6:30 AM
Exit mobile version