मावळ मतदारसंघात पार्थ पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये, गणेश मंडळाच्या भेटीगाठी सुरू

मावळ मतदारसंघात पार्थ पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये, गणेश मंडळाच्या भेटीगाठी सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. पार्थ पवार सध्या मावळ मतदार संघातील गणेश मंडळाच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मावळ लोकसभेत सुरूवात करण्यात आल्यानंतर खारघर, कामोठे आणि पनवेलमध्ये त्यांनी मंडळाच्या आणि कार्यकर्त्यांची भेट घेण्यास सुरूवात केली.

काही दिवसांपूर्वी शिंदेगटात सहभागी झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गंभीर आरोप केला होता. पुण्यातून लोकसभेची तयारी करायला सांगितलं असून शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी नाही तर पार्थ पवार यांच्यासाठी सुरक्षित केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे आता
पार्थ पवार यांचा आजचा दौरा पाहता पवार पुन्हा एकदा मावळमधून सक्रीय झाले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लोकसभेत झालेल्या पार्थ पवारांचा पराभव जिव्हारी लागला होता. पार्थ पवारांच्या रूपाने पवार घराण्यातील पहिल्याच व्यक्तीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता अजित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी वेगळे नियोजन केल्याची चर्चा रंगत आहे.


हेही वाचा : भारतीय नौदलाला मिळालेला ध्वज ही गोष्ट भारतीयांसाठी अभिमानास्पद – आशिष शेलार


 

First Published on: September 2, 2022 10:36 PM
Exit mobile version