धक्कादायक: स्मशानातून मृतदेह उकरून वाळू चोरली

धक्कादायक: स्मशानातून मृतदेह उकरून वाळू चोरली

steal sand cemetery,

राज्यातल्या अनेक भागात वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे. वाळू तस्करी आणि त्या आडून चालणाऱ्या गुन्हेगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. मोकाट सुटलेले वाळूतस्कर वाळूसाठी चक्क आता स्मशानभुमीत पोहचले आहेत. तेथे डवरी समाजाच्या स्मशानभूमीत दफन केलेले दोन मृतदेह उकरून काढून १० ब्रास वाळू तस्करांनी चोरून नेली आहे.

आटपाडी तालुक्यात वाळूतस्कारांनी अक्षरश: थैमान घातले आहे. महसूल विभागाच्या कारवाईनंतर तेवढे चार दिवस थंड होतात. त्यानंतर पुन्हा नव्या दमाने तस्कर वाळू चोरीला लागतात. बोंबेवाडी, कौठुळी, खानजोडवाडी, दिघंची, शेटफळे, करगणी याभागात राजरोसपणे वाळूचोरी चालू असते.या शहरात तर रात्रभर वाळूची वाहने सुसाट धावत असतात. वाळू तस्कर मिळेल तिथून वाळू चोरी करू लागलेत. त्यांच्यावर महसूल आणि पेलिसांचे नियंत्रण राहिले नाही. त्यामुळेच तस्कर स्माशनभुमी पर्यंत पोहचले.

वाळू तस्करीसाठी मृतदेहांची विटंबना

बहुतांश स्मशानभूमी ओढ्या काट्याला असतात त्यामुळे तेथे वाळू असते. आटपाटी येथील डवरी समाजाची स्मशानभूमी शुकओढा पात्रात आहे. तेथे मृतांचे दफन विधी केले जातात. दोन दिवसांपूर्वी वाळूतस्कारांनी स्मशानभूमीकडे आपला मोर्चा वळवला आहे. वाळू भरताना दफनविधी करून केलेले दोन मृतदेह बाहेर काढून वाळू भरून नेली जाते. या मृतदेहांचे कपडे, सडलेले अवयव गेले असून मृतदेहांची विटंबना केली जाते. त्यामुळे संतप्त झालेल्या डवरी समाजाने प्रशासनाकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे तलाठी सुधाकर केंगार यांनी स्मशानभूमीतून १० ब्रास वाळू चोरीला गेल्याची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.


हेही वाचा – मुंबईत ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लागणार, पोलीसांवरही ठेवणार वॉच!


 

First Published on: February 26, 2020 4:42 PM
Exit mobile version