घरताज्या घडामोडीमुंबईत ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लागणार, पोलीसांवरही ठेवणार वॉच!

मुंबईत ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लागणार, पोलीसांवरही ठेवणार वॉच!

Subscribe

महिला अत्याचार प्रकरणात अनेक वेळेला महिला पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करतात मात्र पोलीस वेळीच एफआयआर नोंदवण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र यापुढे महिलांचे एफआयआर दाखल न करणार्‍या पोलिसांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पुढच्या तीन महिन्यांत राज्यातील प्रत्येक पोलीस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लागणार असून स्थानकातील प्रत्येक घडामोडींचे चित्रीकरण केले जाणार आहे. एखाद्या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पोलिसांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

विधानपरिषद सभागृहात हिंगणघाट प्रकरणानंतर महिला अत्याचाराबाबत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. यावेळी आमदार मनिषा कायंदे, उपसभापती निलम गोर्‍हे यांनी पोलीस महिलांचे एफआयआर दाखल करण्यात येत नसल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांचे लक्ष वेधले. यावर उत्तर देत असताना गृहमंत्री देशमुख यांनी सीसीटीव्ही बसविण्याबाबत सुतोवाच केले. येत्या 3 महिन्यात राज्यातल्या सर्व पोलीस स्थानकात सीसीटीव्ही बसवणार आणि या कॅमेराच्या माध्यमातून पोलीस ठाण्यातल्या नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारीचं रेकॉर्डिंग करणार त्यामुळे पोलीस आता एफआयआर घ्यायला टाळाटाळ करत असतील तर त्याला प्रतिबंध होईल, असे देशमुख म्हणाले.

- Advertisement -

मुंबईत आणखी ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लागणार

महिला अत्याचारांना आळा घालण्यासाठी मुंबईत पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. येत्या काळात आणखी पाच हजार सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. तसेच मुंबईतील नव्या आणि जुन्या इमारतींमध्ये सीसीटीव्ही लावणं अनिवार्य केले जाणार आहे. मुंबईप्रमाणेच पुणे, ठाणे, कोल्हापूर सारख्या इतर महानगरात देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत गृहमंत्री देशमुख यांनी सुतोवाच केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -