लाथ लागली म्हणून आला राग; प्रवाशाला थेट धावत्या ट्रेनमधून ढकलले

लाथ लागली म्हणून आला राग; प्रवाशाला थेट धावत्या ट्रेनमधून ढकलले

एका सहप्रवाशाने लाथ लागली म्हणून प्रवाशाला थेट धावत्या ट्रेनमधून ढकलल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. खाली फेकलेल्या प्रवाशाचा या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळते. ‘गरिब रथ’ या गाडीमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. (passenger threw from running train in Nagpur on central railway line)

मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण प्रवासी नागपूरमधील एका उत्सवात जाण्यासाठी गुरुवारी पहाटेच्या सुमारास ‘गरीब रथ’ या ट्रेनमधून निघाले होते. त्यावेळी रेल्वेच्या जनरल डब्यात दाराजवळ हे सर्व तरुण प्रवासी उभे होते. त्यानंतर सकाळी पहाटेच्या सुमारास रेल्वे गाडी नागपूर नजीक असलेल्या बुटीबोरी ते गुमगाव स्थानकादरम्यान आली असता ही घटना घडली.

शेख अकबर या प्रवाशाला पाय लागला. त्यामुळे शेख अकबर आणि आरोपींमध्ये वाद झाला. दोघांमधील वाद टोकाला गेल्यामुळे आरोपी तरुणाने शेख अकबरला चक्क धावत्या ट्रेनमधून खाली फेकले.

गाडीतून खाली ढकलल्याने खाली पडलेल्या शेख अकबर याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी, रेल्वे पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. तसेच, याबाबत पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा – अमेरिकेत भारतीय वंशाच्या चार महिलांवर हल्ला; ‘आय हेट इंडियन्स’ म्हणत ठार मारण्याची धमकी

First Published on: August 26, 2022 10:14 AM
Exit mobile version