घरदेश-विदेशअमेरिकेत भारतीय वंशाच्या चार महिलांवर हल्ला; 'आय हेट इंडियन्स' म्हणत ठार मारण्याची...

अमेरिकेत भारतीय वंशाच्या चार महिलांवर हल्ला; ‘आय हेट इंडियन्स’ म्हणत ठार मारण्याची धमकी

Subscribe

अमेरिकेत भारतीय वंशाच्या चार महिल्यांवर हल्ल्या झाल्याचे लाजिरवाणे प्रकरण समोर आले आहे. अमेरिकन मेक्सिन महिलेने टेक्सासच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या 4 भारतीय महिलांशी गैरवर्तन करत मारहाण केली, ही अमेरिकन महिला एवढ्यावरचं थांबली नाही तर तिने मारहाण केल्यानंतर बंदुकीतून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मेक्सिकन पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, टेक्सासमधील डॅलस येथील हॉटेलमध्ये जेवण करून चार भारतीय वंशाच्या महिला पार्किंगच्या दिशेने चालल्या होत्या. तेवढ्यात अचानक एक मेक्सिकन अमेरिकन वंशाची महिला तिथे आली. यावेळी महिलेने भारतीय महिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत ती महिला म्हणत होती की ‘मला भारतीयांचा तिरस्कार आहे. सर्व भारतीय चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेत येतात. सातत्याने ती भारतीय वंशाच्या महिलांना अपशब्द वापरत होती. आरोपी महिलेने सांगितले की, तिचा जन्म अमेरिकेत झाला, पण ती जिथे जाते तिथे तिला भारतीयच दिसतात. जर भारतात चांगले जीवन आहे तर तुम्ही लोक इथे का येता?

- Advertisement -

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत एका व्यक्तीने लिहिले की, ‘माझी आई आणि तिचे 3 मित्र डेल्लासमध्ये जेवायला गेले होते. ते पार्किंगमध्ये परतत असताना एक मेक्सिकन-अमेरिकन महिला तिथे आली. चौघांवर जातीय टीका करताना तिने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. माझी आई तिला असे न बोलण्याचे आवाहन करत राहिली. तिचे गैरवर्तन वाढत असल्याचे पाहून आईने घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. हे पाहून महिलेला राग आला आणि तिने आई आणि तिच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

पोलिसांनी गंभीर कलमांतर्गत केली महिलांना अटक

आरोपी मेक्सिकन-अमेरिकन महिलेचे नाव एस्मेराल्डा अप्टन असे असून ती टेक्सासमधील प्लानो येथील रहिवासी आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टेक्सासमधील प्लानो शहरातील पोलिसांनी गुरुवारी दुपारपर्यंत एस्मेराल्डा अप्टन या महिलेला अटक केली. तिच्याविरोधात वांशिक हल्ला आणि दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्याचे कलम लावण्यात आले आहे. तसेच तिला 10 हजार अमेरिकन डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

प्लानो आणि डॅलसमधील अंतर फक्त 31 किलोमीटर आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकन समुदायाने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त संताप व्यक्त केला आहे.

पोलिसांनी निवेदन केले जारी

racism with indian americans in texas mexican american woman arrest
अमेरिकन नेत्यानेची प्रतिक्रिया

आशियाई अमेरिकन नेत्या रिमा रसूल यांनीही या मुद्द्यावर ट्विट केले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘हा एक भीतीदायक अनुभव होता. या महिलेकडे एक बंदूकही होती आणि ती भारतीय वंशाच्या महिलांवर गोळीबार करू इच्छित होती. त्या महिलेला त्यांच्या इंग्रजी बोलण्याच्या उच्चारांची अडचण होती. या गंभीर गुन्ह्यासाठी आरोपी महिलेवर कारवाई झाली पाहिजे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -