प्रेयसीसोबत अतिरेक करणाऱ्या प्रियकराला बेदम मारहाण

प्रेयसीसोबत अतिरेक करणाऱ्या प्रियकराला बेदम मारहाण

पूर्ववैमनस्यातून तरुणाला चारली मानवी विष्टा

केअर टेकर असलेल्या तरुणीशी प्रेमसंबंध असलेल्या तरुणाने ती घरात एकटीच असल्याची संधी साधून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रेयसीने आरडाओरड केल्याने तरुणीच्या मावस भावासह शेजारच्यांनी धाव घेऊन तरुणीची सुटका केली. मात्र संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रियकराला चांगला चोप देऊन बेदम मारहाण केली. ही घटना तेली चाळ, महाराजा हॉटेल (कांबे ) येथे घडली.

काय आहे नेमकं प्रकरण?

शिवानंद करिअप्पा चलवादी (३० रा.अमडीहाल,लिंगडपूर,कर्नाटक ) असे बेदम मारहाण केलेल्या प्रियकराचे नाव आहे. त्याचे मुंबईतील ३० वर्षीय केअर टेकर आलेल्या तरुणीशी मोबाईल व्हॉट्सऍपच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळले होते. सदर तरुणी भिवंडीत मावशीकडे पाहुणी म्हणून आली होती. तिचा माग काढत शिवानंद तिला भेटण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री ती एकटीच घरात असल्याची संधी साधून त्याने दरवाजाची कडी लावून तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून मावस भाऊ सुनिल नारायण इंगळे (२८) हा अन्य शेजाऱ्यांसह तिच्या सुटकेसाठी धावून आला. यावेळी पिडीत तरुणीने प्रियकराच्या आगळीकी विषयी माहिती दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या सुनील इंगळे आणि शेजाऱ्यांनी शिवानंद यास ठोश्याबुक्याने आणि लाकडी मारदांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेप्रकरणी सुनिल इंगळे याच्यासह अन्य तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पीडीत तरुणीने प्रियकर शिवानंद याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वंदना गुळवे करीत आहे.

First Published on: April 20, 2019 6:12 PM
Exit mobile version