पोलिसांना चहापान; नागरिकांकडून कर्तव्याचा सन्मान

पोलिसांना चहापान; नागरिकांकडून कर्तव्याचा सन्मान

एरवी पोलिसांना चहापाणी करायचे म्हटले की, ऐकणार्‍याच्या भुवया उंचावल्या जातात आणि एकच संशय कल्लोळ माजतो. पण आता कोणी पोलिसांना चहापाणी करायचे म्हटले की त्याच्याकडे आदराने बघितले जाते& निमित्त आहे करोना आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे.
करोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून अनेक नागरिक घरात बसून असले तरी पोलिस आणि डॉक्टर्स तसेच तत्सम कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावताना दिसत आहे. डॉक्टर्स आणि त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी हॉस्पिटल्सने खाण्या-पिण्याची व्यवस्था केलेली आहे. मात्र पोलिसांना मात्र उन्हातान्हात उभे राहून नागरिकांना हटकावे लागत आहे. काही ‘महाभाग’ तर रस्त्यावरचा शुकशुकाट बघण्यासाठी बाहेर पडत आहेत. काही खासगी कंपन्यांनीही चोरुन लपून कामकाज सुरु केले आहेत. त्यामुळे अजूनही रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. रस्ते निर्मनूष्य करण्यासाठी पोलीस जीवापाड मेहनत घेत आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे. असे असतानाही बाहेर पडणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. अशा नागरिकांना हटकण्यासाठी पोलिसांना उन्हातान्हात उभे रहावे लागत आहे. शहरातील चहाच्या टपर्‍या आणि हॉटेल्सही बंद असल्यामुळे काही नागरिक आता आपल्या इमारतीखाली कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना चहापाणी आणि भोजनसेवा देत असल्याचे सकारात्मक चित्र सध्या दिसत आहे.

शहरातील दिंडोरी नाका, मालेगाव स्टॅन्ड आणि रविवार कारंजा परिसरातील पोलिस कर्मचार्‍यांना समिधा व अथर्व निरंतर या भावा-बहिणीने चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करुन दिली.

 

First Published on: March 24, 2020 3:02 PM
Exit mobile version