पिंपरीत विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ; पती, सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरीत विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ; पती, सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल

अपहरण

पिंपरी-चिंचवडमध्ये डॉक्टर सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी डॉक्टर पती, डॉक्टर सासरा, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे २०१३ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३४ वर्षीय डॉ. सुनेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती डॉ. रोहित दिलीप भोगे, सासरे डॉ. दिलीप प्रतापराव भोगे, सासू उषा दिलीप भोगे आणि नणंद निलांबरी विक्रम साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित डॉक्टर सुनेचा सासरच्या मंडळींनी घरगुती कारणावरून वाद घालून शिवीगाळ करणे, मारहाण करणे, माहेरहून पैसे आणण्यासाठी धमकावणे, उपाशी ठेवणे, इतरांसमोर अपमान करून मानसिक छळ करणे आणि आजारी असताना वैद्यकीय मदत न पुरवता मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास तळेगाव पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा –

आधार कार्डाची गरज काय? राज ठाकरे यांचा मोदी सरकारला सवाल

First Published on: December 21, 2019 12:50 PM
Exit mobile version