आनंदाची बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, इतर राज्यांत दर ‘जैसे थे’च

आनंदाची बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, इतर राज्यांत दर ‘जैसे थे’च

भारतीय केल कंपन्यांनी आज, 24 एप्रलिला सकाळी 6 वाजता पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

Petrol diesel price today : पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे अनेक गोष्टींवर परिणाम होत आहे. त्यामुळे लोक अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची वाट पाहत आहेत. अशा सर्वांना लवकरच दिलासादायक बातमी मिळू शकते. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे इंधन दरात कपात होणार आहे. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

आज डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलच्या किंमती 76.34 डॉलर प्रति बॅरलवर आहेत. तर ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 83 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या आहेत. तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट करतात. सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

महाराष्ट्रात पेट्रोल १.०२ रुपयांनी स्वस्त झालाय. सध्या महाराष्ट्रात पेट्रोलचे दर १०६.१५ रुपये प्रतिलिटर इतके आहेत. तर डिझेल ९९ पैशांनी स्वस्त झाले असून ९२.६७ रुपये प्रतिलिटर दरावर येऊन ठेपला आहे. मात्र, मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. पंजाबमध्ये पेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी महागले आहे. उत्तर प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २२ पैशांची वाढ झाली आहे. तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकातही इंधनाचे दर वाढले आहेत.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

काही राज्यातही विधानसभा निवडणुका लागतील. त्याअगोदरच मोदी सरकार पेट्रोल-डिझेलमध्ये कपातीची खेळी खेळणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती कमी झाल्या अथवा त्याला सक्षम पर्याय मिळाल्यास देशातील महागाई काबूत ठेवण्यासाठीची केंद्र सरकारची कसरत थांबेल.

First Published on: February 19, 2023 2:17 PM
Exit mobile version