पिंपरी चिंचवडमध्ये तरुणावर गोळीबार, सीसीटीव्हीत गोळीबाराची घटना कैद

पिंपरी चिंचवडमध्ये तरुणावर गोळीबार, सीसीटीव्हीत गोळीबाराची घटना कैद

पिपंरी चिंचवडमध्ये तरुणावर गोळीबार, सीसीटीव्हीत गोळीबाराची घटना कैद

पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पुन्हा भीषण घटना घडली आहे. शेलपिंपळगाव येथे एका तरुणावर गोळीबार करत त्याची हत्या केली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजून ७ मिनिटांनी ही घटना घडली आहे. काही दिवसांमध्येच पुन्हा एकदा हत्येची घटना घडली असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले तर नागेश कराळे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल आहे.

पिपंरी चिंचवडमध्ये एका आठवड्यात गुन्ह्याची तिसरी घटना आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव नागेश सुभाष कराळे असे आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचा अंदाज पुणे पोलिसांनी वर्तवला आहे. हत्या करणारे कोण होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

काय घडलं?

हत्या झालेला तरुण नागेश कराळे हा आपल्या चारचाकी वाहनात येऊन बसतो. तेवढ्यात कराळेच्या मागच्या बाजूने एक दुसरी चारचाकी गाडी आली. त्या गाडीतून एक तरुण खाली उतरला आणि नागेश कराळेवर ४ ते ५ गोळ्या झाडतो. नागेश गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. परंतु गोळी लागल्याने नागेश कराळेचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश कराळे याची हत्या जुन्या रागातून करण्यात आली असल्याचा संशय आहे. हल्लेखोरांनी पळ काढला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे. सीसीटीव्हीत घटना कैद झाली आहे परंतु हल्लेखोरांची ओळख पटली नाही. या आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.


हेही वाचा : लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील – सुधीर मुनगंटीवार

First Published on: December 24, 2021 11:37 AM
Exit mobile version