धक्कादायक! पिंपरीत प्रेम प्रकरणाच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या

धक्कादायक! पिंपरीत प्रेम प्रकरणाच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या

Workman dies of electric shock

पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरात प्रेम प्रकरणाच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विराज जगताप असे या मृत तरुणाचे नाव असून आपल्या मुलीवर प्रेम करतो या रागातून एकाच कुटुंबातील सहा जणांनी मिळून या तरुणाला जीवे मारले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून इतर चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातील पिंपळे सौदागर परिसरात ही घटना घडली.

काय आहे प्रकरण 

मृत तरुण विराज जगताप हा आरोपी जगदीश काटे यांच्या मुलीवर प्रेम करत होता. विराज आपल्या मुलीवर प्रेम करतो ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मुख्य आरोपी हेमंत काटे, सागर काटे आणि इतर चार आरोपींनी विराजवर हल्ला केला. ही घटना रविवार, ७ जूनच्या रात्री १० वाजेच्या सुमारास घडली असून त्यावेळी विराज आपल्या दुचाकीवरून जात होता. दरम्यान, आरोपींनी टेम्पोतून पाठलाग करून विराजला पिंपळे सौदागर येथील शिव बेकरीजवळ काढले आणि त्याच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. टेम्पोच्या धडकेमुळे विराज खाली पडला. त्यानंतर आरोपी हेमंत काटे, सागर काटे, जगदीश काटे, रोहित काटे, कैलास काटे आणि हर्षद काटे या आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगड घेऊन विराजला बेदम मारहाण केली.

‘तुझी लायकी आहे का माझ्या मुलीवर प्रेम करायची. तरी तू माझ्या मुलीवर प्रेम करतो’, असे म्हणून आरोपी त्याच्या अंगावर थुंकले आणि लोखंडी रॉड विराजच्या डोक्यात घातला आहे. दगड आणि लोखंडी रॉडने विराजला बेदम मारहाण केल्यामुळे विराज जागेवच बेशुद्ध पडला. तो बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळाले. जखमी अवस्थेत विराजला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारादरम्यान विराजचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तरुणाच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी ८ जून रोजी मुख्य आरोपी हेमंत काटे, सागर काटे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा – जर धारावी जिंकली, तर देश जिंकेल; आनंद महिंद्रा नक्की असं का म्हणाले?

First Published on: June 9, 2020 12:40 PM
Exit mobile version