पबजी चॅटिंगमधून केला सोनसाखळी चोरीचा प्लॅन

पबजी चॅटिंगमधून केला सोनसाखळी चोरीचा प्लॅन

सध्या पबजीचा क्रेझ वाढलेला आहे. या पबजीमुळे अनेकांचा जीव गेला आहे. तर अनेक जण पबजी गेमच्या माध्यमातून पैसे कमवत देखील आहे. मात्र आता पबजीचा वापर चोरीचा प्लॅनिंग करण्यासाठी देखील केला जात आहे. पबजीच्या चॅटिंगचा वापर सोनसाखळी चोरीचे प्लॅनिंग करणाऱ्या पिंपरीतील दोन जणांना अटक केली आहे. सोनसाखळी चोरण्याच्या सात घटना या चोरट्यांकडून उघड झाल्या आहेत. ६६ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक दुचाकी असा एकूण ३ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून पोलिसांनी जप्त केला आहे. यामुळे सांगवी पोलिस ठाण्यातील सहा, चिखली आणि वारजे पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकून आठ गुन्हे या कारवाईमुळे उघडकीस आले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या माहितीनुसार, पोलीस मोबाईलवरून पाठलाग करत असल्यामुळे दोन चोरट्यांनी पबजी गेम चॅटिंगचा संपर्कासाठी वापर केल्याचे पोलीस तपासात कबूल केलं आहे. अश्विन आनंदराव चव्हाण (वय १९) राहणार नवी सांगवी, गणेश बाळू मिंडे (वय २७) राहणार पिंपळे गुरव असं या अटक केलेल्या आरोपींची नावं असून यांच्या साथीदार गणेश हनुमंत मोटे (वय २०) राहणार नवी सांगवी याला देखील पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे.

आरोपींवर यापूर्वी गुन्हा दाखल 

पोलीस मोबाइलवरून पोलीस तपास करीत असल्याची माहिती होती. त्यामुळे इन्स्टाग्रामवरील चॅटिंग आणि पबजी गेम खेळताना चॅटिंग करून हे चोर एकमेकांशी संवाद साधत होते, अशी माहिती मिंडेने दिली आहे. यापूर्वी आरोपी गणेश मिंडे याच्यावर एक गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल असून आरोपी अश्विन याच्यावर देखील बेकायदेशी पिस्तुल ठेवल्यामुळे आणि मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहे.

पोलिसांनी रचला सापळा 

सांगवी पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात सोनसाखळी चोरणाऱ्या महेश माने, गणेश मोटे या दोघांना अटक केली होती. यामुळे त्यांच्याकळून चोरीच्या बारा घटना उघडकीस आल्या होत्या. मात्र तरी देखील सोनसाखळी चोरीचे सत्र थांबत नव्हते. यांच्या चौकशी दरम्यान अश्विन आणि गणेश पोलखोल उघडकीस आली. यानंतर पोलिसांना हे आरोपी पिंपळे गुरू येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून या दोघांनी अटक केली.


हेही वाचा – वर्षाच्या सुरूवातीलाच ‘या’ मराठी अभिनेत्रीने पटकावले ४ पुरस्कार!


 

First Published on: February 4, 2020 11:45 AM
Exit mobile version