वारकऱ्यांच्या मार्गावर गवताच्या टाईल्स, मुक्काम तळ, १२ हजार कोंटी रस्त्याच्या कामांचे पंतप्रधानांकडून लोकार्पण

वारकऱ्यांच्या मार्गावर गवताच्या टाईल्स, मुक्काम तळ, १२ हजार कोंटी रस्त्याच्या कामांचे पंतप्रधानांकडून लोकार्पण

वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा निर्माण करून देतानाच पालखी मार्गावर अधिक सुविधा देणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली. वारकऱ्यांसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग अशा दोन पॅकेजमधील पालखी मार्गांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या सव्वा वर्षात ही कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही गडकरी म्हणाले. वाखरी ते पंढरपूर हा बायपासचा मार्गही पूर्ण करणार असल्याचे गडकरी म्हणाले. वारकऱ्यांना पालखी मार्गात चालताना उष्णतेपासून बचावासाठी गवताच्या टाईल्सचीही सुविधा देण्यात येईल. तसेच वारकऱ्यांच्या राहण्यासाठीच्या सुविधांचेही निर्माण करण्याचा मानस असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. त्यासोबतच पंढरपूरला येणाऱ्या विविध पालखी मार्गांच्या रस्त्यांच्या विकासाचे कामही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मार्गांचे लोकार्पण केले.

कसे आहेत पालखी मार्ग ?

राष्ट्रीय महामार्गामध्ये हे पालखी मार्ग विकसित करण्यात येतील. त्यामध्ये चार लेनचा समावेश असेल. तर वारकऱ्यांसाठी एक स्वतंत्र लेन असणार आहे. पालखीच्या ११ ठिकाणी तळ व्यवस्था असणार आहे. अनेक ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीही या मार्गांचा उपयोग होईल. एकुण १२०० कोटी रूपयांचे योजनांच्या कामांचे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. त्यामध्ये विविध ठिकाणाहून येणाऱ्या पालखी मार्गांचा समावेश आहे. सातारा, सोलापूर, विजापूर, कोल्हापूर, मराठवाडा येथून पंढरपूर येणाऱ्या पालख्यांसाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग

अंतर २२१ किमी
प्रकल्प खर्च – ७ हजार कोटी
पाच पॅकेजपैकी चार पॅकेजमध्ये काम सुरू
१ कामाचे टेंडरचे काम सुरू
कालावधी – एक सव्वा वर्षात
१२ मुक्काम स्थळांची उभारणी

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग

अंतर १३० किमी
प्रकल्पाचा खर्च ५ हजार कोटी
३ पॅकेजमध्ये काम होणार
११ मुक्काम स्थळांची उभारणी
भूमीपूजन लवकरच

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांसोबतच आणखी पाच मार्गांच्या कामाचे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूरला पंढरपूरशी जोडणाऱ्या या एकुण २२३ किलोमीटरच्या आणि १२०० कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एकुण पाच आणखी मार्गाच्या माध्यमातून पंढरपूर हे विविध पालख्यांच्या माध्यमातून जोडले जाणार आहे.

म्हसवड – पिलीव – पंढरपूर
सातारा जिल्हा पंढपूरशी जोडणार
संत गोंदवलेकर महाराजांची पालखी

कुर्डूवाडी- पंढरपूर
मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्राची पंढरपूरशी कनेक्टिव्हिटी
संत सावतामाळी पालखी

पंढरपूर – सांगोला
महाराष्ट्र कर्नाटक जोडणारा मार्ग
सांगली तसेच कोल्हापूरातून येणाऱ्या पालख्या

टेंभूर्णी पंढरपूर
एकनाथ महाराज पालखी यात्रेचा मार्ग

पंढरपूर मंगळवेढा उमदी
गजानन महाराज पालखी मार्गावरून येते

 

वारकऱ्यांसाठी काय सुविधा ?

वारकऱ्यांच्या सुविधांच्या दृष्टीने राज्य सरकारकडून तीर्थ क्षेत्र आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्याठिकाणी पालकी मुक्काम तळासाठी राज्य सरकारच्या वतीने सुविधा देणार आहे. एकूण १४२८ कोटी रूये हे तीर्थ क्षेत्र आराखड्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. या कामामध्ये रस्ते मार्गासारखाच वेग यावा असे मत नितीन गडकरींनी मांडले. आम्ही रस्त्याचे काम करतो आहोत. त्यासोबतच तळ व्यवस्थेचे काम झाले तर पालखी मार्गावर मोठी सुविधा मिळेल. म्हणूनच राज्य सरकारने याचा विचार करावा असेही गडकरी म्हणाले.


 

First Published on: November 8, 2021 4:08 PM
Exit mobile version