या निवडणुकीत २०१४ पेक्षा मोठी लाट – मुख्यमंत्री

या निवडणुकीत २०१४ पेक्षा मोठी लाट – मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपला देशभरात मोठे यश आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपला २०१४ सारखेच मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आज मुख्यमंत्रींच्या हस्ते मुंबईच्या भाजप कार्यालयातील मीडिया रुमचे उद्घाटन झाले. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत २०१४ पेक्षा मोठी लाट आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

‘मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रगती’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मोदींच्या नेतृत्वामध्ये नवे सरकार स्थापन करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. गेल्या पाच वर्षात आम्ही जे काही काम केलं आहे आणि जे नेतृत्व मोदीजींनी दिले आहे, त्याच्या आधारावर मला विश्वास आहे की, खुप मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळेल. बरेच नवे लोकं पक्षामध्ये येऊ घातलेले आहेत. त्यात्यावेळी तुम्हाला ते समजतीलच. पण एकूणच सर्व पक्षामध्ये जे काही चांगले, प्रमुख आणि प्रभावी मंडळी आहेत त्यांना आमच्या महायुतीकडे येण्याची ओढ लागताना दिसत आहे. यामागील कारण आहे की, त्यांनाही असं वाटत आहे की मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रगती करु शकतो आणि सुरक्षित राहू शकतो.’

‘भाजपची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर होणार’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘देशात लोकसभेची निवडणूक रंगात येत आहे. भाजपची पहिली यादी आज किंव्हा उद्या येऊ शकते. यादीच्या संदर्भातील सर्व चर्चा झाली आहे. सर्व नावे एकमताने अंतिम करण्यात येत आहेत. काही नावे राहिले आहेत ती देखील लवकरच अंतिम होतील. महायुतीसाठी लोकांची मते तयार झालेली पाहायला मिळत आहेत आणि लोक महायुतीच्या बाजूनेच आहेत. आज २०१४ पेक्षाही मोठी मोदी लाठ देशात दिसत आहे. पुन्हा एकदा मोदींना देशात पंतप्रधान म्हणून आणण्यासाठी देशातील जनता तयार आहे.’

First Published on: March 19, 2019 4:07 PM
Exit mobile version