PM Modi security breach : PM मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी गंभीर, मुख्यमंत्री ठाकरेंकडून चौकशीची मागणी

PM Modi security breach : PM मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी गंभीर, मुख्यमंत्री ठाकरेंकडून चौकशीची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाला आहे. मोदींचा ताफा शेतकऱ्यांकडून रोखण्याचा प्रयत्न झाला आहे. ज्या ठिकाणी मोदींचा ताफा थांबला होता ते ठिकाण पाकिस्तानच्या सीमेपासून जवळ होते. यामुळे ही बाब गंभीर मानली जात आहे. मोदींनी या सगळ्या प्रकरावर भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर संताप व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी मोदी पंजाबमध्ये आले होते. परंतु खराब वातावरणामुळे मोदींनी हेलिकॉप्टरने जाण्याचे रद्द करुन रस्ते मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. रस्ते मार्गाने जात असताना मोदींचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला होता. एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा १५ ते २० मिनिट अडकला होता. ते ठिकाणही पाकिस्तानच्या बॉर्डरपासून अवघ्या काही अंतरावर आहे. पंजाब सरकारने जाणूनबुजून सुरक्षा यंत्रणेत हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परंतु एसपीजीच्या सुरक्षा योजनेत त्रुटी असल्याचा आरोप पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच मोदींच्या सुरक्षेत झालेली त्रुटी गंभीर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीची गंभीर चुकीची सखोल चौकशी केली असल्याची माहिती म्हणाली आहे.

खासदार संजय राऊत ट्वीट करत म्हणाले की, पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षे बाबत कोणतीच तडजोड होता कामा नये. पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.


हेही वाचा : PM Modi Security Breach: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीच्या प्रकरणात अमित शहांनी चौकशीसाठी केली समिती स्थापन

First Published on: January 7, 2022 8:07 AM
Exit mobile version