पंतप्रधान मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर; मुख्यमंत्री शिंदेंकडून तयारीची पाहाणी

पंतप्रधान मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर; मुख्यमंत्री शिंदेंकडून तयारीची पाहाणी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (19 जानेवारी 2023) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वांद्र्यातील वांद्रे कुर्ला संकलातील मैदानात सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थळाची पाहाणी केली. या पाहाणीनंतर एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी विविध प्रकल्पांचे उद्धाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे सर्व प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत, असे सांगितले. (PM Modi to visit Mumbai tomorrow Chief Minister Eknath Shinde inspected the preparations)

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या मुंबईत दौरा आहे. मुंबई महापालिकेतील विविध विकासाची कामं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 7 एसटीपीचे भूमीपूजन आहे. जे मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच, काँक्रिटचे रस्ते आहेत, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, तीन रुग्णालयांचे भूमिपूजन, केंद्र सरकारच्या स्वनिधी योजनेतून १ लाख फेरिवाल्यांना चेक दिले जाणार, मुंबईचे सुशोभिकरण यांसह विविध प्रकल्पांचे उद्धाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे सर्व प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत”, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

“या सर्व प्रकल्पांचे उद्घाटन उद्या होणार असल्याने याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू आहे. त्या तयारीची पाहाणी आज केली. आज संध्याकाळपर्यंत बीकेसी मैदानातील सर्व तयारी पूर्ण होईल. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उद्या मोठ्या संख्येने लोकं उपस्थित राहतील”, असा विश्वासही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा


हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

First Published on: January 18, 2023 6:48 PM
Exit mobile version