घरताज्या घडामोडीपंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना पंतप्रधान सुमारे 38,800 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तत्पूर्वी ते कर्नाटकात पंतप्रधान सिंचन, पिण्याचे पाणी तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना पंतप्रधान सुमारे 38,800 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तत्पूर्वी ते कर्नाटकात पंतप्रधान सिंचन, पिण्याचे पाणी तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. (PM to visit Karnataka and Maharashtra on 19th January)

पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा

- Advertisement -
  • पंतप्रधान सुमारे 38,800 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
  • पंतप्रधान सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2ए आणि 7 चे लोकार्पण करतील.
  • पंतप्रधान मुंबई 1 मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1)चा प्रारंभ करतील.
  • पंतप्रधान सुमारे 17, 200 कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी करतील.
  • मुंबईतील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून, पंतप्रधान 20 ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावाखाना’चे उद्घाटन करतील.
  • 360 खाटांचे भांडुप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील 306 खाटांचे सिद्धार्थ नगर रुग्णालय, आणि 152 खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम, या पंतप्रधान मोदी मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.
  • पंतप्रधान मोदी मुंबईतील सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांचा काँक्रिटीकरण प्रकल्प सुरू करतील.
  • पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही करणार आहेत. या प्रकल्पासाठी 1,800 कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे.
  • पंतप्रधान मोदी स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ करतील.

पंतप्रधान मोदींचा कर्नाटक दौरा

  • केंद्र सरकारच्या जलजीवन अभियानाअंतर्गत, कर्नाटकाच्या कोडेकल इथल्या यादगिरी जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या, यादगीर बहुविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची पंतप्रधान पायाभरणी करतील.
  • नारायणपूर डाव्या काठाच्या कालव्याचे उद्घाटन करतील.
  • पंतप्रधानांच्या हस्ते, राष्ट्रीय महामार्ग-150C च्या 65.5 किमी विभागाची पायाभरणीही होणार आहे. हा सहा पदरी ग्रीनफिल्ड मार्ग प्रकल्प सूरत – चेन्नई एक्सप्रेसवेचा भाग आहे. सुमारे 2000 कोटी रुपये खर्च करुन हा महामार्ग बांधला जात आहे.
  • सरकारी योजना सर्वांपर्यंत100 टक्के पोहोचवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, कलबुर्गी, यादगिरी, रायचूर, बिदर आणि विजयपुरा या पाच जिल्ह्यांतील सुमारे 1475 नोंद नसलेल्या वस्त्या नवीन महसूल गावे म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
  • कलबुर्गी जिल्ह्यातील सेडम तालुक्यातील मालखेड गावात, पंतप्रधान या नव्याने घोषित महसुली गावांतील पात्र लाभार्थ्यांना मालकीपत्रे (हक्कू पत्र) वितरित करतील.
  • पंतप्रधान एनएच-150सी च्या 71 किमी टप्प्याची पायाभरणी करतील. 2100 कोटींहून अधिक खर्चाचा हा 6 पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प सुरत-चेन्नई द्रुतगती महामार्गाचा देखील एक भाग आहे.

पंतप्रधानांचा मुंबई व कर्नाटक दौरा ‘असा’ असेल

- Advertisement -
  • कर्नाटकात पंतप्रधान यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना भेट देतील.
  • दुपारी 12 वाजता यादगिरी जिल्ह्यातील कोदेकल इथे पंतप्रधान सिंचन, पिण्याचे पाणी तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील.
  • दुपारी 2.15 च्या सुमारास पंतप्रधान कलबुर्गी जिल्ह्यातील मालखेडला पोचतील. याठिकाणी नव्याने वसविलेल्या गावांतील पात्र नागरिकांना जमिनीचे मालकी पत्र वितरीत करतील तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन करतील.
  • संध्याकाळी 5 च्या सुमारास पंतप्रधान मुंबई इथे विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करतील.
  • संध्याकाळी 6.30 च्या सुमारास पंतप्रधान मुंबई मेट्रोच्या दोन मार्गीकांचे उद्घाटन करतील आणि मेट्रोतून प्रवास करतील.

हेही वाचा – केरळच्या मुस्लीम शिक्षण संस्थेत मोठा बदल; भगवद् गीता आणि अन्य हिंदू ग्रंथांचे दिले जाणार धडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -