मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही; राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही; राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा कोरोनाची लाट येऊ देणार नाही, असे पंतप्रधानांना सांगितले. यावेळी इतर ९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सहभाग दर्शवला. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींद्वारे हा संवाद साधला. राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. करोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही, यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शवला.

कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर करोनानंतरही उपचार व्हावे, यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात कोविड रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच कोरोनाबाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शीपणे माहिती दिली. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भिती तर अनेकांमध्ये काही ही होत नसल्याची बेजबाबदार वागणूक आहे, तर पोटासाठी बाहेर पडण्याची मजबूरी देखील आहे. अशा तीन अवस्थेत राज्यात कोरोनाचा सामना सुरु असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या निदर्शनास यावेळी आणून दिले.

Krushna Janm 2020 : जाणून घ्या, जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त!

First Published on: August 11, 2020 5:17 PM
Exit mobile version