घरदेश-विदेशKrushna Janm 2020 : जाणून घ्या, जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त!

Krushna Janm 2020 : जाणून घ्या, जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त!

Subscribe

श्रीकृष्णाचा आज, मंगळवारी जन्म सोहळा असून संपूर्ण देशभरात तो साजरा केला जाणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण- उत्सव मर्यादीत लोकांच्याच उपस्थित केले जात आहेत. मात्र जन्माष्टमीचा सोहळा भाविक घराघरांतही करतात. अशावेळी त्यांना जन्माष्टमीची विधीव्रत पूजा कशी करावी याची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. तसे तर श्रीकृष्णाचा जन्म हा रात्री १२ वाजता झाल्याचे त्याच मुहूर्तावर पाळणा हलवून केला जातो. यंदा जन्माष्टमीच्या तिथीवरून काहीसा गोंधळ होता. काही लोकांच्या मते ११ ऑगस्ट ही जन्माष्टमीची तिथी असल्याचे सांगितले जात होते तर काहींनी १२ ऑगस्टची तारिख दिली होती.

- Advertisement -

दरम्यान, ज्योतिषाचार्य कमल नंदलाल यांच्या मते ११ आणि १२ ऑगस्ट या दोनही दिवशी जन्माष्टमी साजरा करता येऊ शकते. मात्र या दिवसानिमित्त उपवास करणाऱ्यांसाठी तो कधी सोडायचा याची वेळ लक्षात घेणे आवश्यक आहे. मंगळवार, ११ ऑगस्टला स्मार्त समुदायातील लोक जन्माष्टी साजरा करतात. ज्यामध्ये विवाहीत, कौटुंबिक लोकांचा समावेश होतो. तर बुधवार, १२ ऑगस्ट रोजी वैष्णव समुदायातील लोकं जन्माष्टमी साजरा करतात. मथुरा आणि काशीतील सर्व कृष्ण मंदिरात १२ तारखेला जन्माष्टमी साजरा केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मंगळवारी सुर्योदयानंतर अष्टमी तिथी सुरू होते. अष्टमी तिथी मंगळवार, ११ ऑगस्टला सकाळी ९.०६ वाजता मुहूर्ताला सुरूवात होईल. ही तिथी बुधवार, १२ ऑगस्ट सकाळी ११.१६ मिनिटापर्यंत असणार आहे. तसेच बुधवारी रात्री १२.०५ पासून १२.४७ वाजेपर्यंत बाळगोपाळाची पूजा करता येणार आहे.

हेही वाचा –

विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम – असा होणार गणेशोत्सव साजरा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -