Lata Mangeshkar : पुष्पचक्र वाहून पंतप्रधान मोदींनी लतादीदींना वाहिली आदरांजली

Lata Mangeshkar : पुष्पचक्र वाहून पंतप्रधान मोदींनी लतादीदींना वाहिली आदरांजली

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्यांनी ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्र, सिने क्षेत्र आणि क्रिडा क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लतादीदींना अखेरचा निरोप दिला आहे. पुष्पचक्र वाहून पंतप्रधान मोदींनी लतादीदींना आदरांजली वाहिली आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही तब्येतीची चौकशी केली. तसेच मंगेशकर कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं आहे. लतादीदींना आदरांजली वाहिल्यानंतर मोदी रवाना झाले.

पीएम मोदींनी भाजपचे सर्व कार्यक्राम रद्द केले. त्यानंतर लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मोदी मुंबईत दाखल झाले. तसेच लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी मोदी शिवाजी पार्कवर उपस्थित राहीले. त्यानंतर त्यांनी लतादीदींना आदरांजली वाहिली.

नरेंद्र मोदींनी लतादीदींना आदरांजली वाहिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता शाहरूख खान, जावेद अख्तर, आमिर खान तसेच सर्व राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी, बॉलिवूड कलाकार, संगीत क्षेत्र आणि क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली आहे.

पीएम मोदींचं ट्विट

लतादीदींच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण झालीय. ती पोकळी भरून काढता येणार नाही, अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी केली आहे.


हेही वाचा : Lata Mangeshkar : लतादीदींचा शेवटचा प्रवास, अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी


 

First Published on: February 6, 2022 7:12 PM
Exit mobile version