पुण्यात पीएमपीएमएल बसला अपघात ; १० जण जखमी

पुण्यात पीएमपीएमएल बसला अपघात ; १० जण जखमी

(फोटो सौजन्य : लोकसत्ता)

पुण्यातील पीएमपीएमएलच्या बसला भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. कात्रजहून निगडीच्या दिशेने आलेल्या पीएमपीएमएल बसला अपघात झाला असून या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अपघात कसा झाला?

पुण्याची पीएमपीएमएल बस कात्रजहून निगडीच्या दिशेने निघाली होती. या बसमधून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. वारजे माळवाडीच्या उड्डाणपुलाजवळ बस सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोचल्यानंतर बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस उड्डाणपुलाजवळील असलेल्या २० फूट खोल ओढ्यात पडली. या अपघातात दहा जण जखमी झाले. क्रेनच्या सहाय्याने ही बस ओढ्यातून बाहेर काढण्यात आली. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पुर्ववत करण्यात आली आहे.

First Published on: July 2, 2018 5:19 PM
Exit mobile version